तिटवे / प्रतिनिधी

एकाद्या शिक्षण संस्थेचा विस्तार व्हायचा असेल, प्रगती व्हायची असेल तर त्यासाठी विद्यार्थ्यांसोबतच पालकांचा विश्वास असणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्यासारख्या असंख्य पालकांनी आमच्या संकुलवार ठेवलेल्या विश्वासामुळेच शहीद शिक्षण समूहाची घोडदौड सुरु आहे, असे मत शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी व्यक्त केले. महाविद्यालयामध्ये आयोजित पालक मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या. या वेळी माता पालकांसाठी ‘सुपर मॉम’ स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये बिद्री येथील सौ. सुनीता पाटील विजयी झाल्या. या पालक मेळाव्यास दोनशेहून अधिक पालक उपस्थित होते.

शहीद शिक्षण प्रसारक मंडळ आणि महाविद्यालय गेल्या काही वर्षांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात अग्रेसर असून या सर्वांमध्ये पालकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत प्रा. दिग्विजय कुंभार यांनी प्रास्ताविकेतून व्यक्त केले. महाविद्यालयातून दीडशेहून अधिक मुली वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नियुक्त झाल्या आहेत. इथून पुढेही प्लेसमेंटची ही परंपरा कायम राहील असा विश्वास ट्रेनींग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सागर शेटगे यांनी व्यक्त केला.

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करत आहे. महाविद्यालयात जे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात त्याची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून मिळत असते. महाविद्यालयातील उपक्रमांचे कौतुक करत पालकांनी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदविल्या.

या पालक मेळाव्याचे आयोजन सर्व विभागांच्या वतीने करण्यात आले असून प्रा. ज्योती शिंदे यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी पहिली. सूत्रसंचालन प्रा. सिद्धता गौड, मधुरा पाटील यांनी केले. आभार प्रा. अविनाश पालकर यांनी मानले. या वेळी प्रा. काजल बलुगडे, प्रा. विशाल कांबळे, प्रा. गायत्री पाटील, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *