
(तिटवे : प्रतिनिधी)
शहीद सीताराम पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे वास्तुशिल्प क्षेत्राचे देवता भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली. “विश्वकर्मा हे केवळ देवशिल्पकार नव्हते, तर त्यांनी मानवाला साधने, तंत्रज्ञान आणि सृजनशीलतेचा वारसा दिला आहे. वास्तुकलेच्या प्रत्येक घटकात त्यांचे योगदान दडलेले आहे.असे मत प्राचार्य हिमांशू चव्हाण यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते. शेवटी विद्यार्थ्यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त एकत्रित संकल्प घेतला की, वास्तुकलेच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी योगदान देऊ.
या कार्यक्रमाला प्रा. अभिजीत कांबळे , प्रा. गणेश तुरंबेकर , प्रा. बाबासाहेब कांबळे , विनायक पाटील विद्यार्थी उपस्थित होते.



