
Ladki Bahin Yojana e-KYC :महायुतीला विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. ही योजना राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून चालवली जाते. या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य शासन देत असल्याचं म्हणत सर्व लाभार्थी महिलांनी 18 सप्टेंबरपासून पुढील 2 महिन्यांच्या आत सदरई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन केलं आहे. त्यामुळं येत्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ही प्रक्रिया जे लाभार्थी पूर्ण करणार नाहीत त्यांना या योजनेतून मिळणारा लाभ दिला जाणार नाही. याबाबत काल राज्य शासनाकडून महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहिण योजना गेल्या वर्षी सुरु करण्यात आली होती. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 14 हप्ते मिळाले आहेत. जुलै 2024 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत महिलांना लाभ मिळाला आहे. आता सर्व महिलांचे लक्ष सप्टेंबर महिन्याच्या हफ्त्याकडे आहे.
आदिती तटकरे यांनी या पुढं म्हटलं की ही प्रक्रिया योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे, असं आदिती तटकरे म्हणाले. या शासन परिपत्रकानुसार आता या योजनेच्या सर्वच पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. येत्या दोन महिन्यांच्या काळात लाडक्या बहिणींना केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार अशी माहिती परिपत्रकातून समोर आली आहे.
लाडक्या बहिणींना ईकेवायसी करताना काही अडचणी येत असतील तर ९८५०६०९६११ किंवा ९०७५२२९८०२ मोबाईल नंबरच्या व्हॉटसअपवरती लाभार्थी महिलेचे आधार कार्ड तसेच पतीचे आधार कार्ड , आधार लिंक असलेला मोबाईल नंबर पाठवू शकता. तुमची ईकेवायसी करुन मिळेल.





