( तिटवे : प्रतिनिधी )

नवरात्र उत्सवामधील मुख्य आकर्षण म्हणजे गरबा दांडिया होय . शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय तिटवे आयोजित केलेल्या ‘दांडियामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी माहोल निर्माण केला .दम मारिया, अंबे अंबे ,ढो ढोल बाजे अशा विविध गाण्यांवर महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी ठेका धरला होता.घगरा चोली, कुडता अन् दागदागिनेही… दांडियासाठी आधुनिक आणि पारंपरिकतेची सांगड घातली जात आहे. हा बदल अगदी पेहराव दागदागिन्यांच्या प्रकारापासून आहे. या दांडियाच्या परंपरेला साजेसा घागरा चोली, कुडता हा हटके ट्रेंड महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीच्या मध्ये पाहायला मिळाला. हा सर्व माहोल बघून प्रेक्षकांचे डोळे दिपले.
या दांडियासाठी बारा ग्रुप नी सहभाग घेतला होता.ह्या सर्वच ग्रुप नी अतिशय चांगला दांडिया खेळला. आणि यामध्ये बीएस्सी आयटी एसवाय ग्रुप ने प्रथम क्रमांक मिळवला . बीसीए एसवाय ने दृतीय क्रमांक मिळवला या कार्यक्रमासाठी परिवेक्षक म्हणून प्रा. शुभांगी भारमल,आणि विजय वाइंगडे लाभले.
यावेळी वेस्ट फॉर बेस्ट या स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि दहीहंडी स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. एसएनडीटी विभागीय युथ फेस्टिवल मध्ये नाविन्यपूर्ण यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थिनींना सत्कार करण्यात आला. एसएनडीटी आयोजित क्रीडा महोत्सवांमध्ये नाविन्यपूर्ण यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार यावेळी करण्यात आला.
या दांडिया महोत्सवाचे समन्वयन प्रा. सागर शेटगे व प्रा. ज्योती शिंदे यांनी जबाबदारी पाहिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य.प्रशांत पालकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.स्नेहल कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रा. दिग्विजय कुंभार यांनी मानले. यावेळी नर्सिंग प्राचार्य सरिता धनवडे, फार्मसी प्राचार्य स्नेहल माळी, आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य हिमांशू चव्हाण , सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



