(कागल /प्रतिनिधी)

छत्रपती शिवाजी महाराज व छ्त्रपती शाहू महाराज यांचा आदर्श समोर ठेवून शहरासह तालुक्यात विकास कामांच्या माध्यमातून रयतेचे राज्य आणण्यासाठी समरजितसिंह घाटगे व आम्ही हातात हात घालून एकोप्याने काम करू.असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी व शाहू आघाडीच्या उमेदवारांच्या कागल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी वीरेंद्रसिंहराजे घाटगे व अखिलेशराजे घाटगे युवराज पाटील,उमेदवार स्वरुपा जकाते,सुमन गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले,अकरा वर्षाच्या संघर्षानंतर मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने आम्ही विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून एकत्र आलो. यावर काहीजण खुश तर काहीजण नाराज आहेत.त्याला काय करु शकत नाही.परंतु आम्ही एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत.शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, गेल्या काही वर्षात एकमेकांवर टिकेत ताकद वाया घालविली.मात्र आता चांगले काम करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या पुढाकारातून युती झाली.त्यांच्या फाॕर्म्युल्यास संमती दिली.त्यांचे कागलवर चांगले लक्ष आहे.रस्ते-गटर्स या कामापलिकडे जाऊन आदर्श कागलचे व्हीजन समोर ठेवून काम करु.शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर कागल करु.पालिकेसाठी अनुभवी व नव्या दमाच्या उमेदवारांना संधी देत नव्या-जुन्यांचा सुरेख मेळ घातला आहे.
यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सविता माने जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने राजेंद्र जाधव शितल फराकटे उमेदवार जयवंत रावण,अर्जुन नाईक विजय काळे सोनल यादव यांनीही मनोगत व्यक्त केले.छायाचित्र कागल येथे राष्ट्रवादी व शाहू आघाडीच्या पालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रचार सभेत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, व्यासपीठावर शाहू उद्योग समुहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे राजे वीरेंद्रसिंह घाटगे अखिलेशराजे घाटगे व इतरचौकट उच्चशिक्षित नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आदर्शवत काम करूआमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सविता माने या एम ए बी एड उच्च शिक्षित असून त्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत. त्यामुळे त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात राष्ट्रवादी व शाहू आघाडीचे आम्ही सर्वच नगरसेवक चांगले काम करून राज्यात आदर्श निर्माण करू. अशी ग्वाही उमेदवार जयवंत रावण यांनी दिली.



