(कागल /प्रतिनिधी)

प्रस्तावित आयटी पार्कसाठी शेंडा पार्कातील जागेबाबत साशंकता आहे. त्याऐवजी हा आयटी पार्क कागलमध्ये उभारु.अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कागल येथे प्रभाग क्रमांक 08 व 09 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ पूढे म्हणाले,कागल एमआयडीसीतआयटी पार्कसाठी जागा आरक्षित केली आहे.यासाठी समरजितसिंह घाटगे व मी दोघे मिळून पाठपुरावा करु.आयटी पार्कमुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपल्बध करुन आपल्या भागातील मुले पुणे मुंबई सारख्या ठिकाणी न जाता त्यांना स्थानिक पातळीवरच रोजगार मिळेल.

समरजितसिंह घाटगे म्हणाले की सुदृढ व सक्षम युवा पिढी उभा करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करू. विविध स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन करण्यासह रोजगार करू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देऊ.

नवाज मुश्रीफ यांनी स्वागत तर उमेदवार प्रविण काळबर यांनी प्रास्ताविक केले. अखिलेशसिंह घाटगे , नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सविता माने , प्रभाग आठच्या उमेदवार रजिया मुजावर , बाळासाहेब माळी, शरीन नाईक ,किरण लाड यांचीही भाषणे झाली. भय्या माने, शाहु साखरचे संचालक सतीश पाटील, आप्पासाहेब भोसले, असिफ मुल्ला, जावेद नाईक, इरफान मुजावर , आदी मान्यवर उपस्थित होते. फिरोज काझी यांनी सुत्रसंचलन तर आभार अस्लम मुजावर यांनी मानले.

———————————————–

बंडखोरांना सज्जड इशारा :

मंत्री मुश्रीफ म्हणाले की आम्ही ज्यांना पदे देऊन मोठे केले. तेच आम्हाला आव्हान देत आहेत. बंडखोरी करुन शत्रुगोठाशी सांधन बांधुन वर आम्हाला विचारीत आहेत , साहेब माझ काय चुकल ? आम्ही सांगूनही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला .येथेच तुमच चुकल. प्रविण काळबर कर्तुत्वान युवक आहे.त्यास प्रंचड मतांनी विजयी करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *