​चिमगाव / प्रतिनिधी


  • प्रा तुकाराम पाटील
    “विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या हातात लेखणी आणि वही असेल, तरच समाज प्रगत होईल. माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून चालणारे फाउंडेशन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच पुढाकार घेते आणि आजचा हा वही वाटप कार्यक्रम त्याच सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे,” असे गौरवद्गार देवचंद कॉलेजचे प्रा. तुकाराम पाटील सर (कुरणीकर) यांनी काढले.
    ​चिमगाव येथील विद्या मंदिर चिमगाव शाळेत सतेज उर्फ बंटी पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य वही वाटप समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
    ​या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे नेते मा. अमर चौगले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच चिमगाव शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. पूजा मयूर आंगज, शिवसेनेचे तालुका संघटक मा. मारुती पुरी बुवा, शिवाजी जाधव, अनिल मांगले, अरुण रनवरे आणि अनिल सडोलकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
    ​कार्यक्रमा दरम्यान काँग्रेसचे प्रवीण माळी, विकास पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका संघटक मारुती पुरी बुवा म्हणाली की, सतेज उर्फ बंटी पाटील फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या या वह्या केवळ अभ्यासाचे साधन नसून, ग्रामीण भागातील मुलांच्या स्वप्नांना दिलेले बळ आहे, अशी भावना व्यक्त केली
    शाळेचे मुख्याध्यापक मारुती उर्फ बटू जाधव म्हणाले की, अशा मदतीमुळे पालकांवरील आर्थिक भार कमी होतो. यावेळी सूर्यवंशी मॅडम, नोकरी मॅडम, वर्धन सर, इतर शिक्षक वृंद, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *