मुरगूड / प्रतिनिधी

जिद्द, चिकाटी, व आत्मविश्वासच्या जोरावर केलेले कष्ट तसेच खडतर परिश्रम यामुळे यश निश्चित मिळते. मेहनतीच्या बळावर मिळवलेले यश हे इतरांच्यासाठी प्रेरणादायी असते असे गौरवोद्गागार पंचशील शिक्षण संस्थेचे सचिव अबीद हसन मुश्रीफ यांनी काढले. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या (यू पी एस सी) परीक्षेत भाई माधवरावजी बागल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज विक्रमनगर काॅलेज ची विद्यार्थिनी कु.अरूषा शरद पाटील हिने देशात 553 रँक मिळवत यश संपादन केलेबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्प गुच्छ, देऊन सत्कार करण्यात आला आला.
या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.ए.कोळेकर, पर्यवेक्षक विजय पाटील प्रा.एकनाथ पाटील प्रा.सौ.एस.डी.धुरे.प्रा.पी.पी.कापसे.प्रा.सौ.एफ आर शेख.प्रा.
चंद्रकांत कांबळे,प्रा.प्रमोद अनुसे या़ंच्या सह शिक्षक पालक उपस्थित होते
माझ्या या यशामध्ये भाई माधवरावजी बागल हायस्कूल ज्युनियर कॉलेज विक्रमनगर या कॉलेजचे देखील मोठा वाटा आहे . मी या कॉलेजमध्ये अकरावी व बारावी कला शाखा निवडली व आपल्याला स्पर्धा परीक्षेत करिअर करता येतं या बद्दल आत्मविश्वास निर्माण झाला. अभ्यासातील सातत्य व खडतर परिश्रम शिक्षकांचे तसेच आई-वडिलांचे मार्गदर्शन यामुळेच आपल्याला यश मिळाले आहे.चौथ्या प्रयत्नात यश मिळाले व ५५३ रंक पर्यंत झेप घेता आली.



