(निढोरी / प्रतिनिधी)
येथील ग्रामपंचायतीच्या वतीने श्वास अभियान अंतर्गत चालु हंगामात ४०० झाडांचे वृक्षारोपण उदिष्ट होते ते गेले चार दिवसांपासून लावण्याचे कामकाज सुरू होते. विविध जातीची फळ देणारी रोपे लाऊन त्यांची योग्य जोपासना ग्रामपंचायत व होतकरू श्वास अभियान मधील तरुणांच्या माध्यमातून होणार आहे! तर निसर्गातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडेच महत्त्वाची आहेत,हा सामाजिक उपक्रम डोळ्यासमोर ठेऊन श्वास अभियानाची संकल्पना बिद्रीचे मा. व्हाइस चेअरमन व सध्याचे विद्यमान संचालक सुनिलराज सुर्यवंशी यांनी सुरू केली असून गत सालापासून प्रति वर्षी लोकांचा चांगला सहभाग वृक्षारोपणासाठी मिळत आहे .
मागील सालात पहिल्याच वेळी एक हजार झाडे लाऊन ती वर्षभरात वेळेच्या वेळी औषध फवारणी, पाण्याची योग्य सुविधा व चांगले संपोगन करून बहुतांशी झाडे जगवण्यात यश मिळाले आहे गेल्या तीन चार दिवसांत विविध मान्यवरांनी वृक्षारोपण करुन ग्रामपंचायत कडील या उपक्रमाला सहभाग नोंदवला आहे! तर नदी काठावरील स्मशानभूमीची सार्वजनिक स्वच्छता करून विविध जातीच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले, या वेळी गावचे प्रमुख व बिद्रीचे जेष्ठ मा. संचालक सुरेशराव सुर्यवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, या वेळी सरपंच, उपसरपंच संपत नाना मगदूम,रणजीतसिंह सुर्यवंशी, एकनाथ कळमकर, बाजीराव मगदूम, योगेश सुतार,गोटु आण्णा चितळे,राहुल सुतार, विशाल भाकरे, पांडुरंग मगदुम, ग्रामपंचायत कडील कर्मचारी एस.डी.मगदुम, संजय कांबळे, सुनिल रंडे, आनंदा भारमल,सातापा पसारे, धोंडीराम मगदूम आदीनी उपस्थित राहुन वृक्षारोपण करण्यासाठी परीश्रम घेतले.या कामासाठी सरपंच सौ.शुभांगी यांनी उपस्थित मान्यवरांचे व श्रम दान करणाऱ्या नागरीकांचे आभार मानले!