मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांचे आशीर्वाद
निडसोशी / प्रतिनिधी
समाजातील सर्वच जाती धर्मातील जनतेच्या उद्धारासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय असून आम्हाला त्यांचे कौतुक वाटते, असे गौरवोद्गार निडसोशी मठाचे अधिपती श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी काढले.निडसोशी ता. हुक्केरी येथील श्री. दुरदंडेश्वर संस्थान मठ येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी समाधीचे दर्शन घेऊन त्यानंतर श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विविध धर्मातील योगदानाबद्दल बोलताना श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी म्हणाले, हसन मुश्रीफ यांनी समस्त लिंगायत समाजाच्या उन्नती आणि उद्धारासाठी तसेच बेरोजगार तरुण-तरुणींसाठी श्री. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा केला आणि त्याला यशस्वी आले यातील किरकोळ तांत्रिक अडीअडचणी दूर करण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत तसेच मुश्रीफ यांनी कागल येथे श्री बसवेश्वर महाराजांचा पुतळा उभारला असून अलीकडेच त्यांनी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी विद्यापीठात शरण साहित्य अध्यासनाला मंजुरी मिळवून देऊन त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधीही दिला आहे. या अध्यासनातून महात्मा बसवेश्वर स्वामीजींच्या जीवनकार्याचा व विचारांचा प्रचार आणि प्रसार सबंध महाराष्ट्र व कर्नाटकासह देशभर होणार आहे.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, मानव धर्म हा एकच धर्म आणि सेवा हेच कार्य मानून संपूर्ण आयुष्य गोरगरिबांसाठी वेचत आलो आहे. विविध जाती धर्मियांनी गुण्यागोविंदाने सलोख्याने नांदावे, या भावनेनेच काम करत आलो आहे.
या पुढच्या आयुष्यभरही सर्वधर्मीय जनतेच्या कल्याणासाठीच कार्यरत राहणार आहेत्यावेळी राजशेखर दड्डी, सुरेश कोळकी, रमेश रिंगणे, विठ्ठल भमाणगोळ, राजेंद्र तारळे, प्रीतम कापसे, काशिनाथ गुरव, अरविंद कित्तूरकर, नागाप्पांना कोल्हापुरे, सुधीर पाटील, जवाहर घुगरी, अरुण बेल्हेर, दयानंद खन्ना, दीपक पाटील, राजू पाटील, बाळासो घुगरी, महेश गाढवी, माजी जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, गडहिंग्लज कारखाना अध्यक्ष प्रकाश पठाडे, किरण कदम, राहुल शिरकोळे, संतोष पाटील, राकेश पाटील, वसंतराव यमगेकर, शिवराज पाटील, उदय पाटील, बी.बी.पाटील, बसवराज हंजी, अमरनाथ घुगरी, अनिल गुरव, गुंडू पाटील, अमर मांगले, विकास रामणकट्टी, राजू खानंगावे, नरेंद्र भद्रापूर, विनोद बिलावर, सिद्धार्थ बन्ने, अभी पाटील, महेश पाटणे, राजू जमादार, समर्थ मिसाळ, प्रसाद कांबळे, तुषार वाटवे यांच्यासह अनेक भक्तगण उपस्थित होते.
श्री. शिवलिंगेश्वर महास्वामींचे आशीर्वाद….
उपस्थितांनी श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजींचा पुष्पहार व शाल अर्पण करून सत्कार केला. त्यानंतर महास्वामीजींनी क्षणाचाही विलंब न करता अनपेक्षितपणे स्वतःच्या गळ्यातील हार काढत तो पुष्पहार मुश्रीफ यांच्या गळ्यात घातला. यावर उपस्थितांमध्ये एकच चर्चा झाली की, महाराजांच्या आशीर्वादाची पुण्याई मुश्रीफ साहेब तुम्हाला मिळाली आहे.