मळगे ब्रुदुक / प्रतिनिधी
छत्रपती शाहू महाराजांनी सिद्धनेर्ली, ता. कागल येथील दलित समाजाला कसण्यासाठी साडेपाच एकर जमीन दिली होती. हि जमीन समरजीत घाटगेंनी पोलीस बळाचा वापर करून काढून घेतली आहे. माझे हे वक्तव्य खोटे असल्याचे सिद्ध करावे.मळगे येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले मिळालेला सत्तेचा वापर करीत मतदार संघातील मूलभूत सोयी सुविधांचा अभ्यास करून नियोजनबद्ध विकास केला आहे. शासनाच्या सर्वच योजना गाव खेड्यातील वाड्या वस्त्यांवर प्रभावीपणे राबवल्या. या माध्यमातून दिनदलित, वंचित, उपेक्षित लोकांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून मला अभिमान वाटतो.तुम्ही मला आशीर्वाद दिला नसता, तर मी आमदार व मंत्रीही झालो नसतो. त्याचबरोबर इतके प्रचंड कामही करता आले नसते. पण; तुम्ही दिलेल्या संधीने मला तालुक्याचे नंदनवन करता आले. हे माझे भाग्य समजतो
गोकुळचे संचालक अमरीश घाटगे म्हणाले, अल्पसंख्यांक समाजातील असतानाही आपल्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वातून मंत्री मुश्रीफ यांनी खूप मोठा जनाधार मिळवला आहे. त्यांची काम करण्याची पद्धत ही गटा- तटांच्या पलीकडची आहे. म्हणूनच या तालुक्याचा सर्वांगीण विकास होताना व्यक्तिगत विकासापर्यंतही त्यांचे कार्य पोहोचले आहे. अशा या असामान्य नेत्याची जपणूक करण्याची गरज असल्याने आमच्या गटाने त्यांना पाठिंबा दिला असून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन अमरीश घाटगे यांनी केली.
भाजप जिल्हाअध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, कागल परिसराच्या हरितक्रांतीचे प्रणेते हसन मुश्रीफच आहेत. त्यांच्या माध्यमातून हा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या अभूतपूर्व कार्याचा महिमा पिढ्यानपिढ्या चिरंतन दरवळत राहील. मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्य भविष्यात कोणीही मोडू शकणार नाही.त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन नाथाजी पाटील यांनी केली.
गेल्या तीस-चाळीस वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत पहाटे पासून रात्रीपर्यंत गोरगरिबांच्या कल्याणासाठीच आयुष्य वेचले आहे.कागल मतदार संघातील जनता याची साक्षीदार आहे.मिळालेल्या सत्तेचा वापर गोरगरिब व वंचितांच्या , शोषितांसाठी केला, त्यासाठी प्रसंगी प्रचलित कार्यातही बदल केला. परिणामी शासनाच्या सर्व योजना गावांबरोबर वाड्या-वस्त्यांवर पोहचविनारा आधुनिक श्रावणबाळ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना मळगे गावातून प्रचंड मतांनी विजयी करू असे आश्वासन भगवान अस्वले यांनी दिले.
यावेळी विजय काळे, अशोक कमळकर, कृष्णात सोनाळे, एकनाथ पाटील सतिश पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रतापसिंह पाटील यांनी केले. आनंदराव अस्वले, मनोज फराकटे, रणजित मुडूकशिवाले,रघुनाथ अस्वले, निवास परबकर, श्रीकांत पाटील, साताप्पा परबकर, प्रवीण पाटील,सरपंच नलिनी सोनाळे, ग्रामपंचायत सदस्य शांताबाई पाटील, एकनाथ वायदंडे ,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.