December 22, 2024

बिद्री / प्रतिनिधी

अत्याधुनिक मशिनरींनी सज्ज असलेला बिद्री साखर कारखाना चालू गळीत हंगामात प्रतिदिन आठ ते नऊ हजार मे. टन ऊस गाळप करणार आहे. यामुळे हंगामात जवळपास ११ लाख मे. टन ऊस गाळपाचे उदिष्ठ ठेवले असल्याची माहिती कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी दिली. कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापन गळीतास येणाऱ्या ऊसाला उच्चांकी ऊस दर देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.

बिद्री ता. कागल येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाचा सर्व संचालक व अधिकारी यांच्या हस्ते गव्हाणीत ऊस मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. तत्पुर्वी ऊस तोडणीचा शुभारंभ संचालक दीपक ज्ञानू किल्लेदार यांच्या हस्ते तर काटा पुजन संचालक उमेश भोईटे यांच्या हस्ते करण्यात आले. गव्हाणीचे विधीवत पुजन संचालक आर. के. मोरे व त्यांच्या पत्नी सौ. कल्पना मोरे या उभयतांच्या हस्ते झाले.

कार्यकारी संचालक चौगले म्हणाले, चालू गळीत हंगामासाठी जवळपास १२५० लहान –मोठ्या वहानांचे वहातुकाचे करार केले आहेत. यामध्ये बीड भागातील ३२५ ऊस तोड टोळ्यांचा समावेश असून तोडणी यंत्रणा अधिक सक्षम केली आहे. येत्या काही दिवसात गाळपास प्रारंभ केला जाणार असून त्यानुसार तोडणी नियोजन केल्यामुळे तोडणी व वाहतुकीची अडचण निर्माण होणार नाही. बिद्रीच्या व्यवस्थापनावर तमाम सभासदांचा प्रचंड विश्वास आहे. बिद्रीच्या प्रामाणिक श्रमजीवी कर्मचाऱ्यांचे कारखान्याच्या यशात नेहमीच योगदान राहिले आहे. त्यांना अधिकचा लाभ देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशिल आहे. तरी सभासदांनी पिकविलेला सर्वच्या सर्व ऊस कारखान्याकडे गळीतासाठी पाठवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केला.

कार्यक्रमास प्रविणसिंह पाटीस, सुनिल सुर्यवंशी,धनाजीराव देसाई, पंडीतराव केणे, उमेश भोईटे, मधूकर देसाई, के. ना. पाटील, डी. एस. पाटील, सत्यजित जाधव, राहूल देसाई, राजेंद्र मोरे, रंगराव पाटील, मनोज फराकटे, दीपक किल्लेदार, रविंद्र पाटील, संभाजी पाटील, राजेंद्र भाटले, रणजित मुडुकशिवाले, फिरोजखान पाटील, रामचंद्र कांबळे, फत्तेसिंग पाटील, रावसाहेब खिलारी, सौ. क्रांती उर्फ अरुंधती संदिप पाटील, सौ. रंजना आप्पासो पाटील, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई यांच्यासह आजी – माजी संचालक, तोडणी – वाहतुक कंत्राटदार, ट्रक, ट्रँक्टर चालक वाहक, तोडणी – वाहतुक कामगार, कारखानांतर्गत विविध कामांचे ठेकेदार, कामगार, सभासद चार तालूक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *