December 22, 2024

कागल / प्रतिनिधी

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनासाठी कागलमधील त्यांच्या घराकडे रीघ सुरू होती. कागल- गडहिंग्लज- उत्तुर विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेसह कार्यकर्ते पदाधिकारी आणि मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे आबाल- वृद्धांसह महिलांचाही सहभाग मोठा होता.

मंत्री श्री. मुश्रीफ सकाळी साडेसात वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापुरात उतरले. कोल्हापूरहून कागलकडे येत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या कागल आगारासमोर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. आज भेटून अभिनंदन केलेल्यांमध्ये माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, श्रीमती प्रविता सालपे, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, आजरा पंचायत समितीचे माजी सभापती शिरीष देसाई, गोडसाखरचे अध्यक्ष प्रकाशभाई पताडे, उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण, बिद्री साखर कारखान्याचे संचालक आर. व्ही. पाटील, डी.एम चौगले, ए. वाय. पाटील- म्हाकवेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, राजेंद्र माने, भीमगोंडा पाटील तसेच विविध संस्था- संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भेटून अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *