संचालक मंडळाच्या बैठकीत आयोजन
(कोल्हापूर / प्रतिनिधी)
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात नवनिर्वाचित आमदार हसन मुश्रीफ व आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांचे सत्कार झाले. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या सत्काराचे आयोजन केले होते.
आमदार हसन मुश्रीफ यांचा सत्कार उपाध्यक्ष व माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते झाला. आमदार श्री. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांचा सत्कार माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या हस्ते झाला.
मुश्रीफांची समयसूचकता………!
जिल्हाभरातून आलेले पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आणि कर्मचारीही मंत्री श्री. मुश्रीफ यांना भेटून अभिनंदन करीत शुभेच्छा देत होते. त्यावेळीच नवनिर्वाचित आमदार अशोकराव मानेही आले आणि श्री. मुश्रीफ यांना पुष्पगुच्छ दिला. क्षणाचाही विलंब न लावता श्री. मुश्रीफ यांनी कर्मचाऱ्यांकडून शाल, श्रीफळ, फेटा आणि पुष्पगुच्छ देत श्री. माने यांचाही सत्कार केला.
बँकेच्या केंद्र कार्यालयात खासदार धनंजय महाडिक नवनिर्वाचित आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, पंचगंगा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी. एम. पाटील यांनीही आमदार श्री. मुश्रीफ यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
यावेळी संचालक मंडळातील उपाध्यक्ष व माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार संजयबाबा घाटगे, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, प्रा.अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे व आय. बी. मुन्शी आदी संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते