(कोल्हापूर/ प्रतिनिधी)
आधुनिक काळात टिकायचे असेल तर संगणकाशी मैत्री करावी लागेल व ते शिकावं . विद्यार्थ्याना संगणकीय शिक्षणाचे धडे देण्यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत प्रत्येक शाळेवर संगणक प्रयोगशाळेसाठी एक इन्स्ट्रक्टर रुजू करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, राज्य प्रकल्प संचालक श्रीमती आर विमला यांनी आयसीटी (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) हा उपक्रम राबवला जात आहे.
यामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ शाळांमध्ये हा उपक्रम चालू असून, अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, श्रीमती आर विमला यांच्या सूचनेप्रमाणे व कोल्हापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मीना शेंडकर (प्राथमिक) व माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर(माध्यमिक)यांच्या मार्गदर्शनाने राबविण्यात येत आहे,तर येणाऱ्या काळात या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल अशी अपेक्षा आहे.