December 22, 2024

(बिद्री / प्रतिनिधी ) :

कागल तालुक्यातील हमिदवाडा येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी फराकटेवाडी ( ता. कागल ) येथील मंडलिक गटाचे कट्टर समर्थक आनंदराव ईश्वरा फराकटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ते कारखान्याचे संस्थापक संचालक असून त्यांना पहिल्यांदाच उपाध्यक्षपदी संधी मिळाली आहे. त्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.


आनंदराव फराकटे यांनी कारखान्याच्या स्थापनेपासून म्हणजे १९९७ ते २०१७ असे सलग वीस वर्षे संचालकपद भूषविले आहे. २०२३ साली कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यावेळी कारखान्याचे चेअरमन व माजी खास. संजय मंडलिक यांनी पुन्हा आनंदराव फराकटे यांना संचालकपदी संधी देत फराकटे यांच्या निष्ठेला प्राधान्य दिले होते. त्यांची आज सर्वानुमते उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. फराकटेवाडी सारख्या लहानशा गावाला असे पद पहिल्यांदाच मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *