(तिटवे / प्रतिनिधी )
शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयातील कम्प्युटर सायन्स विभागातील कु.तनुजा देवकुळे या विद्यार्थिनींची इन्फोसिस या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य प्रशांत पालकर यांनी दिली.
दर वर्षी प्रमाणेच शहीद महाविद्यालयाने या ही वर्षी प्लेसमेंटमध्ये आपले प्रभुत्व कायम ठेवले आहे. एम. एस्सी. कम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण होण्या आधीच तनुजा देवकुळे या विद्यार्थिनीला इन्फोसिस यानामांकित कंपनी मध्ये निवड होताना दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थिनींच्या, पालकांच्या आणि महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत दिले जाणारे प्रशिक्षण हे कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी लागण्यासाठी अतिशय पूरक व उपयोगी होत आहे असे तनुजा देवकुळे हिने सांगितले.
शहीद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर उपप्राचार्य सागर शेटगे, प्रा. अश्विनी कांबळे आणि प्राध्यापक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.