
(विशेष वृत्त/ समाधान म्हातुगडे)
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी कुटुंबीयांसोबत आज आदमापूर (ता. भुदरगड) येथे बाळूमामा मंदिरास भेट देऊन श्री. संत सद्गुरू बाळूमामाचे दर्शन घेतले.

आज सकाळी गारगोटी येथे प्रा. शिंदे यांचे आगमन झाले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, प्रदेश सचिव अलकेश कांदळकर यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून आदमापूर येथे ते दर्शनासाठी आलेत. यावेळी श्री बाळूमामा देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील , प्रदेश सचिव अलकेश कांदळकर , देवस्थान समितीचे दत्तात्रय पाटील, दिनकर कांबळे, संदीप मगदूम , संभाजी पाटील, दिलिप पाटील , सरपंच विजय गुरव, लहू जरग, भाजपा भुदरगड तालुकाध्यक्ष नामदेव चौगले, भाजपा राधानगरी तालुकाध्यक्ष संभाजी आरडे, भाजपा कागल तालुका उपाध्यक्ष एम एम चौगले, सोनाळीचे ग्राप सदस्य समाधान म्हातुगडे, महेश पाटील ,धनाजी आरडे ,सुधाकर गुरव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.



