( प्रतिनिधी / निपाणी )

स्वर्गीय श्रीमानशेठ किरणाभाई शाह यांच्या जयंतीनिमित्य दि.-26-12-2024 रोजी घेण्यात आलेल्या देवचंद टॅलेंट सर्च परीक्षेत 12 वी कला शाखेतील 125 विध्यार्थी यामध्ये सहभागी झालेले होते. सदरच्या परीक्षेमध्ये गुणानुक्रमे यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांची नावे व बक्षिसे खालील प्रमाणे आहेत.

प्रथम- कु. मुस्कान नजीर सय्यद 82.00%
द्वितीय-कु. संज्योती संदीप गुरव 80.00%
तृतीय-कु. आदित्य चंद्रकांत परीट 78.00%

उत्तेजनार्थ -1कु. अंजली सुरेश भोसले 68.00%
उत्तेजनार्थ -2 कु. धनश्री महादेव देवळे 66.00%
वरील यशस्वी विध्यार्थ्यांना श्रीमान डी.सी. शाह ट्रस्ट तर्फे रोख रक्कम प्रथम क्रमांकास 1001 द्वितीय क्रमांक 701 व तृतीय क्रमांक 501, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व प्रा.एन.एम. मधाळे यांच्यातर्फे भारतीय संविधानाची प्रत व निपाणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे
ग्रंथाची भेट , डॉ.सी.एम.नाईक यांच्याकडून इतिहासाची पुस्तके व प्रा.एस.जी. न्हिवेकर यांच्याकडून राज्यशास्त्र विषयाची पुस्तके देण्यात येणार आहेत.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ.सौ तृप्तीभाभी शाह व खजिनदार श्री सुबोधभाई शहा यांची प्रेरणा मिळाली तर महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो डॉ जी डी इंगळे ,उपप्राचार्य एस पी जाधव व पर्यवेक्षक मेजर डॉ.अशोक डोनर यांचे मार्गदर्शन मिळाले.ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्पर्धेचे मार्गदर्शक प्रा नामदेव मधाळे, परीक्षा निमंत्रक प्रा. सागर परीट, प्रा विजयकुमार पाटील प्रा.प्रकाश पाटील ,प्रा विनायक कुंभार , प्रा.सदानंद झळके , प्रा.स्वप्निल पोतदार व सिद्धू बेडर या सर्वांनी सहकार्य केले. ही परीक्षा महाविद्यालयातील संगणक कक्षामध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न स्पर्धा परीक्षेत कसे सोडवावेत याचा सराव देण्यात आला.यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील सर्व घटकांच्या मार्फत अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *