
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारी संपर्क प्रमुख पदी भडगाव तालुका कागल येथील विद्यमान सरपंच बाळासाहेब तथा बी एम पाटील यांची नुकतीच निवड झाली आहे.
पाटील यांचे सहकार व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामकाज , ग्रामीण विकासाचा अनुभव तसेच सरपंच परिषदेच्या कामकाजातील सक्रिय सहभाग , योगदानाबद्दल प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या हस्ते मुंबई येथे नुकतेच नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. विकास जाधव ,प्रदेश सदस्य व विश्वस्त शिवाजी अप्पा मोरे, आनंद जाधव, बापू जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या निवडीसाठी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जी एम पाटील , जिल्हा समन्वयक ॲड. दयानंद नानासाहेब पाटील नंद्याळकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
पाटील हे भडगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील सरपंच असून वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक आहेत . निवडी वेळी कोल्हापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समाधान म्हातुगडे, तालुका अध्यक्ष कृष्णात बुरटे, दीपक अंगज, दीपक कुंभार, रमेश सावंत, सुनील बोंगार्डे, बंडेराव सूर्यवंशी, इत्यादी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य हजर होते. श्री पाटील यांच्या निवडीमुळे तालुका व परिसरातून त्यांचे अभिनंदन ,कौतुक होत आहे.



