December 23, 2024

मुरगूड / प्रतिनिधी: जोतीराम कुंभार

मुरगुड येथील श्रीराम मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रामनवमी भक्तिमय वातावरणात पार पडली यावेळी सकाळी महा अभिषेक होऊन महाआरती झाली त्यानंतर ह भ प श्रीरंग पाटील महाराज हळदी ता. करवीर यांचे कीर्तन पार पडले बारा वाजता जन्मकाळ सोहळा पार पडला यावेळी उपस्थित महिलांनी पाळणा गायीला संध्याकाळी भजन सोहळ्यानंतर सुंठवडा आणि लाडूचे वाटप करण्यात आले. यंदाच्या रामनवमी सोहळ्यावर आयोध्या येथील प्रभू श्रीराम रामाच्या मंदिर आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या उत्सवाचे वातावरण होते यामुळे शहरातील राम भक्त आणि मुरगुड मधील सर्व भक्तांनी या सोहळ्याचे नियोजन केले होते . सकाळपासूनच प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी भावीक भक्तांनी मोठी गर्दी केली होती.


या सोहळ्याचे नियोजन मंदिराचे पुजारी अनुबोध गाडगीळ, सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, तानाजी भराडे, प्रकाश परिशवड, आनंदा रामाने, शिवाजी चौगले, महेश कुलकर्णी यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *