विशेष वृत्तसेवा /समाधान म्हातुगडे
मुरगूडचे भूमिपुत्र असणाऱ्या विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना मुरगुड शहर आणि मुरगुड परिसरातून विक्रमी मताधिक्य प्राप्त करण्यासाठी मुरगूड शहरातील सर्व गटातील नेते व कार्यकर्ते यांनी वज्रमूठ बनवली असून मुरगूडसह परिसरात उच्चांकी मताधिक्य देऊन कागल तालुक्यात गतवेळपेक्षा दीड लाखाहून अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वांनी कंबर कसण्याचे आवाहन उपस्थित सर्वच नेते व कार्यकर्ते यांनी केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पालकमंत्री हसन मुश्रीफ होते.
यावेळी गोकुळची माजीचेअरमन रणजीतसिंह पाटील शेतकरी संघाचे चेअरमन प्रवीण सिंह पाटील, नगराध्यक्ष राजेखान जमादार, नामदेवराव मेंडके, अनंत फर्नांडिस या सर्वच गटातटाच्या नेत्यांनी एकत्र येत एकीची वञ्रमुठ दाखवली.
खासदार संजय मंडलिक यांनी उमेदवारीची चर्चा, घोषणा, पक्षांच्या बैठका याविषयी माहिती देऊन ग्रामदैवत अंबाबाई मंदिराची पूर्तता व वास्तुशांत सोहळ्याच्या निमित्ताने मुरगूड एकसंघ झाले हे चित्र पुढच्या काळातही कायम करण्याचा आपला प्रयत्न असेल. पेन्शरांचे गाव अशी ओळख न ठेवता मुरगूड सर्वांग सुंदर गाव बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. कागल, गडहिंग्लज शहराच्या बरोबरीने मुरगूडचा विकास करण्याचेही अभिवचन दिले. खासदारकीची सुरुवातीची अडीच वर्षे महापूर आणि कोरोना महामारीत गेली. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर एकनाथराव शिंदे यांना आम्ही पाठबळ दिले यामुळे जिल्ह्याला तब्बल ८०० कोटीचा निधी देता आला. तालुक्यातील जिल्हा परिषद निहाय तसेच मुरगुड, कागल, गडहिंग्लज शहराला दिलेल्या १७० कोटी ७२ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची माहिती यावेळी मंडलिक यांनी दिली. तसेच महिला आरक्षण, हटवलेले 370 कलम, सहकार मंत्रालयाची स्थापना अद्ययावत लोकसभा भवन उभारणी, वंदे मातरम जलद व अद्यावत रेल्वे महामार्गाचे देशभर विनलेले जाळे, छोट्या शेतकऱ्यांचे सामूहिक व्यवसायाला अर्थसहाय्य, किसान सन्मान निधी योजना, अयोध्येतील राम मंदिर उभारणी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या क्रांतीकारक अशा कामांमुळे मोदींची पंतप्रधानपदाची हॅटट्रिक नक्की आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे वेदगंगा नदी काठावरील पाण्याचे ऋण फेडण्याची मतदारांना ही संधी आली आहे. मुरगूडसह तालुक्याच्या विकासाचा पाया दिवंगत मंडलिकांनी घातला. मंडलिक यांच्या विचारावर श्रद्धा ठेवणारे आपण सर्व कार्यकर्ते आहोत. मतदानाची टक्केवारी वाढल्यास उच्चांकी मताधिक्य गाठण्यास मदत करणार आहे. खासदार मंडलिक यांची कोट्यावधींची विकासकामे दिवंगत मंडलिकांचे कार्य तसेच पंतप्रधान मोदी यांच्या कार्याविषयी माहिती दिली. ८० कोटी लोकांना मोफत धान्य, सणावाराला आनंदाचा सिद्धांत, ६ कोटी लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ, उज्वला गॅस कनेक्शन, 12 कोटी घरात शौचालयास अनुदान, आयुष्यमान भारत अशा मोदींनी दिलेल्या जनकल्याणाच्या योजना घराघरात माहिती देऊन देण्याचे आवाहन केले.
गोकुळचे माजी अध्यक्ष रणजीत सिंह पाटील व शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांनी मुरगूड शहरात जास्तीत जास्त पदाधिक्य मिळवून देण्याचा शब्द दिला यावेळी ऍड. विरेंद्र मंडलिक, राणाप्रतापसिंह सासने, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, अनिल सिद्धेश्वर, कॉ. अशोक चौगले, विशाल भोपळे, दिगंबर परीट, यांनी मनोगते व्यक्त केली. ऍड. सुधिर सावर्डेकर यांनी स्वागत केले. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी प्रस्ताविकामध्ये मुरगूड शहराच्या विकासातील खासदार मंडलिक आणि नामदार हसन मुश्रीफ यांच्या कोट्यावधी रुपयांची विकास कामे दिल्याची कृतज्ञतापूर्वक नोंद केली. दगडूशेणवी यांनी आभार मानले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष अनंत फर्नांडिस, बजरंग सोनुले, जयसिंगराव भोसले, संतोष वंडकर, अशोक खंडागळे, संजय गांधी निराधार समिती सदस्य राजू आमते व छोटू चौगले, बी. एस. खामकर, नामदेव भांदिगरे, किरण गणकर, सुनील रणवरे, सुहास खराडे, दत्तात्रय मंडलिक, संदीप कलकुटकी, सुनील रणवरे, मारुती कांबळे, दिगंबर परीट, संभाजी आंगज, संजय मोरबाळे, विलास गुरव, रंगराव पाटील, बजरंग सोनुले, डॉ. सुनिल चौगले, अशोक खंडागळे, दत्तामामा जाधव, सुहास खराडे, विशाल सुर्यवंशी, वस्ताद आनंदा गोधडे, नितीन दिंडे, विजय काळे यांच्यासह शहरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.