(तिटवे : प्रतिनिधी)
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा प्रादेशिक युवा महोत्सव २०२५ दिनांक १२ व १३ सप्टेंबर रोजी शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, तिटवे येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या दोन दिवसीय युवा महोत्सवात सांस्कृतिक कला, लोककला आणि आधुनिक कलेचा सुंदर संगम दिसून येणार आहे. नृत्य, गायन, नाट्य, चित्रकला, वक्तृत्व, लोकनृत्य तसेच ललितकलेच्या इत्यादी स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळणार आहे.
युवा महोत्सवाचे उद्दिष्ट केवळ मनोरंजन नव्हे, तर विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, भारतीय संस्कृतीचे जतन करणे हा आहे.या युवा महोत्सवात विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.“तरुणींच्या कलेचा रंगोत्सव – प्रादेशिक युवामहोत्सव २०२५” मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कला आणि संस्कृतीचा आनंद घ्या, असे आवाहन शहीद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केली केले आहे.



