
(गारगोटी/ प्रतिनिधी)
जयहिंद सहकार समूहाच्या सर्व संस्थाचा कारभार पारदर्शी व काटकसरीने चालत आहे. संचालक मंडळ , सभासद व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे संस्थाचा नावलौकीक वाढत आहे. सेवा संस्थेचा स्थापनेपासून ऑडीट वर्ग अ असून सभासद पातळीवर शंभर टक्के वसुली असणारी ही अग्रगण्य संस्था आहे .म्हणूनच सभासदांना डिव्हिडंट वाटप करत आहोत. असे प्रतिपादन संस्थापक व भुदरगड तालुका संघाचे संचालक प्रा . एच .आर . पाटील प्रा.एच आर पाटील यांनी व्यक्त केले.
कोनवडे (ता .भुदरगड) येथील जयहिंद सहकार समूह प्रणित जयहिंद सेवा संस्था, जयहिंद दूध संस्था, शिवभवानी दूध संस्था ,हिराई दूध संस्था या संस्थांच्या वार्षिक सर्व साधारण सभेवेळी ते बोलत होते. सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडल्या. अध्यक्षस्थानी समूहाचे संस्थापक प्रा . एच .आर . पाटील होते . तर प्रमुख उपस्थितीत सखाराम पाटील ,पी .आय .पाटील, धनाजीराव शिंदे, अजित बुडके , टी . एल . शिंदे होते .स्वागत डी . डी .पाटील यांनी केले .
यावेळी सोसायटीची प्रथम कर्जफेड करणाऱ्या रघुनाथ ज्ञानदेव पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला . अहवाल वाचन सचिव संभाजी पाटील यांनी केले .
जयहिंद समूहातील दूध संस्थांनी दूध उत्पादकांना आतापर्यंत उच्चांकी रिबेट वाटप केले आहे. ही परंपरा यापुढेही कायम राहील .अशी ग्वाही जयहिंद दूध संस्थेचे चेअरमन आनंदराव लोकरे यांनी दिली .
यावेळी गुणवंत विद्यार्थी व नूतन उपसरपंच सौ. शीतल तानाजी पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
म्हैस दुध :प्रथम क्रमांक – आनंदा महादेव पाटील, द्वितीय क्रमांक – यशवंत दत्तात्रय लोकरे, – तृतीय क्रमांक – प्रकाश दत्तात्रय लोकरे तर गाय दुध : प्रथम क्रमांक – सौ .पूजा दिगंबर पाटील ,द्वितीय क्रमांक – सुहास शिवाजी पाटील ,तृतीय क्रमांक – विलास कृष्णा पाटील यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले .
यावेळी जयहिंद सेवा संस्था चेअरमन पी .के . पाटील, व्हा.चेअरमन यशवंत लोकरे ,हिराई दूध संस्था चेअरमन अजिंक्य पाटील, व्हा.चेअरमन बाजीराव पाटील, जयहिंद दूध संस्था व्हा . चेअरमन पांडूरंग पाटील, शिवभवानी दूध संस्था व्हा .चेअरमन सौ . राधाताई तानाजी पाटील यांच्यासह शाहूराजे भोसले ,विलास पाटील , तात्यासो शिंदे ,बाबुराव पाटील ,जयसिंग शिंदे ,रामचंद्र पाटील , बाजीराव गुरव ,अनिल शिंदे, सुनिल पाटील , प्रकाश पाटील ,एकनाथ पाटील , साताप्पा पाटील ,तुकाराम पाटील , वसंत पाटील, कृष्णात कांबळे, वैभव पाटील, दिपक पाटील,दशरथ पाटील आदीसह सर्व संस्थांचे संचालक मंडळ ,सभासद व कर्मचारी उपस्थित होते .आभार सचिव दयानंद पाटील यांनी मानले .



