
( सोनाळी / प्रतिनिधी )
सोनाळी ( ता. कागल ) गावचे सुपुत्र पांडूरंग म्हातुगडे ( आण्णा ) यांची नुकतीच भाजपा ज्येष्ठ नागरीक आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करणेत आली आहे. भाजप जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्या या निवडीबद्द्ल सोनाळी ग्रामपंचायतचे सदस्य समाधान म्हातुगडे यांनी ग्रामस्थांच्यावतीने शाल व श्रीफळ देवून त्यांचा सत्कार केला.
जनसंघामध्ये १९६० पासून कार्यरत आहेत. १९६५ साली माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे कच्छ सत्याग्रहात सहभाग घेतला होता. तसेच १९७१ मध्ये बांग्लादेश मान्यता दिली त्यावेळी दिल्ली येथील सत्याग्रहात सहभागी झाले होते. १९७५ सालच्या आणीबाणीच्या काळात ४१ दिवसाचा तुरुंगवास त्याना भोगावा लागला होता. भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते म्हणून जनसामान्यांचे कार्य करताना त्यांचे अनेक विकासकामात त्यांचे योगदान राहिले आहे. सध्या त्यांचे वय ८३ वर्षे असून सुध्दा जनसेवेत अजूनही ते कायम कार्यरत आहेत. सध्या ते इचलकरंजी येथे वास्तव्यास असून तिथे त्यानी जनसंघाची विचारधारा व भाजपाचे व्हिजन सर्वसामान्य नागरिकापर्यत पोहचवून पक्ष वाढीत मोठे योगदान दिले आहे. त्यांची जन्मभूमी असलेल्या सोनाळी गावासाठीही त्यानी पूर्वीच्याकाळी विकासकामात तसेच जनतेच्या वैयक्तिक कामात त्यांचा सहभाग राहिला आहे.



