
सोळांकूर/प्रतिनिधी
आगामी होऊ घातलेला जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत राधानगरी तालुक्याच्या विकासासाठी समविचारी मंडळीना बरोबर घेऊन आघाडी करणार असल्याची घोषणा जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक ए वाय पाटील यांनी केली.
आमजाई व्हरवडे (ता,राधानगरी)येथे ए वाय पाटील गटाचा प्रमुख कार्यकर्ता मेळावा झाला त्यावेळी ते प्रमुख उपस्थित म्हणून बोलत होते. स्वागत प्रास्ताविक मानसिंग पाटील यांनी केले .
ए वाय पाटील म्हणाले कि तालुक्यातील सामान्य जनता माझ्याबरोर आहे त्यामुळे सर्वाना विश्वासात घेऊनच तालुक्याच्या विकासासाठी समविचारी मंडळीना बरोबर घेऊन आघाडी करणार आहे ही आघाडी करत असताना माझ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याचीही काळजी घेईन.

आगामी निवडणूकिच्या निमित्ताने राधानगरी तालुक्यात चांगले संघटन बाधणार आहे.अशी घोषणा त्यांनी केली.
यावेळी जिल्हा कसबा तारळे जिल्हा परिषद मतदार संघातून शिल्पा राजराम कवडे, संपदा शिवाजीराव पाटील, दिपाली दिपक पाटील सोनाली शिवाजी पाटील,
राधानगरीतून मोहन पाटील कसबा वाळवेतून प्रभाकर पाटील,बबन जाधव सरवडेतून वैशाली राजेद्र पाटील राशिवडेतून कृष्णात पोवार, विलास हळदे यांनी उमेदवारीची मागणी केली.याप्रसंगी ए वाय पाटील फौंडेशनचावतीने कृषी सोलर पंपाची मंजुरी पत्रे वाटप करण्यात आली.
यावेळी शिवाजीराव पाटील, राजेद्र कवडे ,प्रभाकर पाटील महादेव कोथळकर,प्रकाश पोवार,जोतीराव पाटील दयानंद जाधव यांची भाषणे झाली.
यावेळी आर वाय पाटील संदिप पाटील नेताजी पाटील डी बी पाटील,राजू कवडे विजयसिंह तौंदकर अशोक पाटील, वाय डी पाटील,अविनाश पाटील, चंद्रकांत पाटील,गौतम कांबळे, स्वप्नील पाटील, मोहन पाटील प्रकाश मोहिते तानाजी काटकर विलास हळदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रामराव इंगळे यांनी केले तर आभार विशाल पाटील यांनी मानले.

——————————-
‘ए वाय’ यांचा करिश्मा कायम
विधानसभेनंतर झालेल्या ए वाय गटाच्या दुसर्या मेळाव्यात सुगीचे दिवस असूनही मेळाव्याला झालेली प्रचंड गर्दी पहाता ए वाय पाटील यांच्या मागे मोठी जनता असल्याचे स्पष्ट होते गर्दीकडे पहात ए वाय पाटीलही गहिवरले.
‘ ए वाय’ ना वगळून सत्ता शक्य नाही!
गेली पंचवीस वर्षे राधानगरी पंचायत समितीवर एक हाती सत्ता असणाऱ्या ए वाय गटाची ताकद जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळे सर्वच राजकिय मंडळी व पक्ष ए वाय यांच्याबरोबर आघाडी करण्यासाठी आग्रही असल्याचे चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी सांगीतले
ए वाय’ यांचे राजकीय गुपित कायम?
आजच्या मेळाव्यात ए वाय पाटील कोणाबरोबर आघाडी करण्याची घोषणा करणार काय याकडे सर्वच राजकिय पक्षांचे लक्ष लागून राहिले होते पण आजच्या मेळाव्यातही त्यांनी आपले गुपित कायम ठेवल्याने ए वाय यांच्या भुमिकेबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.



