(व्हनाळी /सागर लोहार)


जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील येणा-या प्रत्येक गावागावातील कार्यकर्त्यांचा मला अभिमान वाटतो. गेली चाळीस वर्षे सर्वांना पराभूत करून पंचायत समितीची सत्ता आपल्याकडे ठेवण्यात सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान देवून ख-या अर्थाने आपली पार्टी जीवंत ठेवली. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत जास्त जागा कशा निवडून येतील व पंचायत समितीवर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कशी संधी देता येईल यासाठी आमचे प्रयत्न राहणार असून कागल पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा असे आवाहन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी कार्यकर्त्यांना केले.


व्हनाळी ता.कागल येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पदाधिकारी,कार्यकर्ते व पदवीधर मतदार नोदंणी मार्गदर्शन मेळाव्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

कागल विधानसभा प्रमुख अंबरिषसिंह घाटगे ,यशवंत उर्फ बॅाबी माने,विजया निंबाळकर प्रमुख उपस्थित होते.


अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, कागल तालुक्याची राजकिय व भौगोलिक परिस्थिती पाहता सर्वांनी महायुती म्हणून लढले पाहिजे. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत. सर्वांनी भाजप म्हणून पदवीधर निवडणूकीकडे पाहिले पाहिजे. कार्यकर्त्यांनी पदवीधर मतदारांची नोंदणी घराघरात जावून करावी. पंचायत समिती ही आपल्या गटाची मातृसंस्था आहे त्यामुळे सर्वांनी आतापासूनच कामाला लागावे अशा सुचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या.


यावेळी मंडल अध्यक्ष अॅड. अमर पाटील,एकनाथ पाटील, दिग्वीजय पाटील,अजयसिंह चव्हाण यांनी पदवीधर मतदान नोंदणी विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास अॅड. सुधिर सावर्डेकर, एम.बी.पाटील, दिनकर पाटील,गुणाजी निंबाळकर,के.के.पाटील,मल्हारी पाटील,नानासो कांबळे,युवराड कोईगडे,शामराव पोवार,ज्ञानदेव पाटील, दिलीप कडवे,सुरेश मर्दाने,विठ्ठल कांबळे,सिद्राम गंगाधरे,बाजीराव पाटील,संजय चिंदगे आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वागत अॅड. अमर पाटील यांनी केले सुत्रसंचलन रमेश जाधव तर आभार के.बी.वाडकर यांनी मानले.


त्यांच्या उमेदवारीला आमचा बिनशर्त पाठिंबा…


आमचे कांही लोकांशी मतभेद असले तरी मुरगूड नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी प्रविणसिंह पाटील यांच्या घरातील उमेदवार असतील तर त्यांना आमचा बिनशर्त पाठिंबा राहिल असे गौरवोद्गार संजयबाबा घाटगे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त करताच उपस्थितांनी त्यांना टाळ्यांनी दाद दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *