आळते येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला जोरदार प्रतिसाद
(कोल्हापूर / समाधान म्हातुगडे )
युवा नेतृत्व खासदार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी विजयासाठी हाडाची काढं आणि रक्ताचं पाणी करा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी श्री. माने यांना पुन्हा खासदार करा, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री श्री मुश्रीफ आळते ता. हातकणंगले येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित सर्वपक्षीय सभेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणरावजी इंगवले होते.
भाषणात बोलताना पालकमंत्री पुढे म्हणाले, गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारत देशाला विकसित राष्ट्राच्या दिशेने नेले आहे. त्यांनी गेल्या दहा वर्षात केलेली महत्त्वाची कार्ये अशी…..*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात भारत देश विकासाच्या दिशेने…….वर्षभरापूर्वी दारिद्र्यरेषेखालील २५ कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या वर आली……!चार कोटी दहा लाख लोकांना पक्के घर दिले….!दहा कोटी महिलांना उज्वला गॅस कनेक्शन दिले…..!बारा कोटी घरांमध्ये शौचालय दिली…..!
८० कोटी जनतेला मोफत धान्य दिले……! आयुष्मान भारत गोल्ड कार्ड- पाच लाख रुपयांचे मोफत वैद्यकीय उपचार…..!
अवकाशात चांद्रयान – २ ही मोहीम यशस्वी झाली…..! जगातला सर्वात मोठा पुतळा म्हणून सरदार लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा उभारला……! जगातला सर्वात उंचीवरचा रेल्वे पूल “चिनाब रेल्वे ब्रिज” भारतात आहे…..!
जगातला सर्वात उंचीवरचा बोगदा हिमाचल प्रदेशमध्ये आहे…..!जगातील सर्वात मोठा सागरी सेतू “अटल सागरी सेतू” १८. ५ कि. मी. लांबी आज मुंबईत आहे…..! *जगातील सर्वात मोठं कन्वेंशन सेंटर ऑस्ट्रेलियाच्या ऑपेरा हाऊसला मागे टाकीत भारतात दिल्लीमध्ये “भारत मंडपम” म्हणून उभारले……!समस्त भारतवासियांचे गेल्या ५०० वर्षांपासूनचे स्वप्न असलेले प्रभू श्रीराम मंदिर अयोध्येत उभारलं. नुकताच दि. २२ जानेवारी २०२४ रोजी वास्तुशांती सोहळा झाला…..!
*यापूर्वी संरक्षण सामग्री आयात करावी लागायची. आज संरक्षण सिद्धतेमध्ये भारत स्वयंपूर्ण बनला आहे. तो जगाला निर्यात करू शकतो…..!कोविडमध्ये भारताने स्वतःची “कोविड लस” निर्माण केली…..! आज भारत मोबाईल निर्मितीमध्ये जगभरातील सर्वात मोठा मोबाईल निर्माता देश ठरलेला आहे…..!
चारचाकी गाड्यांच्या निर्मितीमध्ये भारत जगात दोन नंबर वर आहे. २०२५ अखेर तो जगात एक नंबर होईल…..!
जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत आज पाचव्या क्रमांकावर आहे. जपान जर्मनी यासारख्या देशांना मागे टाकून लवकरच भारत तिसऱ्या क्रमांकावर येईल…..!
या तीन गोष्टी कटाक्षाने पाळा……..!
पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, या निवडणुकीत तीन गोष्टी कटाक्षाने पाळा. येत्या विधानसभेला तुम्ही काय करणार, असा प्रश्न उमेदवार खासदार श्री. धैर्यशील माने यांना विचारून त्यांची अडचण करू नका. कोणतेही नकारात्मक मुद्दे उकरून काढून त्याची चर्चा करत बसू नका. तसेच; शिवसेना- शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादी, जनसुराज्य, रयतक्रांती, रिपाई आणि मित्रपक्ष मिळून एकदिलाने काम करूया. महायुतीतील घटक पक्षापैकी कोणीही नाराज होऊन त्याचा दुष्परिणाम श्री. माने यांच्या मताधिक्यावर होईल, असे वर्तन आणि वक्तव्य करू नका.
यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्यासह माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार सुरेश हाळवणकर, हिंदुराव शेळके, अशोकराव माने अरुण पाटील, अमर पाटील, संभाजीराव पवार, मिस्त्रीलाल जाजू, किरणराव इंगवले, अजित इंगवले आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.