(विशेष वृतसेवा – समाधान म्हातुगडे)
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी(ता.२७) महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ कोल्हापूरमध्ये जंगी जाहीर सभा होत आहे. या सभेला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
वाळवे खुर्द(ता.कागल)येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ स्व.हिंदूराव पाटील सभागृहात घेतलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
श्री.घाटगे पुढे म्हणाले, विकसित भारताची संकल्पना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी अहोरात्र कार्यरत आहे. त्यांच्या स्वप्नातील बलशाली भारत जागतिक महासत्ता बनवण्यासाठी एक-एक खासदार महत्त्वाचा आहे. त्यासाठी कोल्हापूर व इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ जंगी जाहीर सभा होत आहे.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,अजित पवार,मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांचे विजयासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन पंतप्रधान मोदी यांच्यासह प्रमुख नेते मंडळी करणार आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित असणे आवश्यक आहे. प्रमुख कार्यकर्त्यांनी यासाठी नियोजन करावे.
बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व दूध साखर बँकेचे चेअरमन बाबासाहेब पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत दहा वर्षांमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा संधी देऊया. कागल तालुक्यात तीन प्रमुख गट एकत्र आले आहेत. त्यामुळे कागल तालुक्याची ताकद उच्चांकी मताधिक्याच्या माध्यमातून दाखवून देऊया.
यावेळी सदा साखरचे संचालक आनंदराव फराकटे, मसू पाटील, उपसरपंच भरत पाटील, हनुमंत सुता, नंदकुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक पाटील, तालुकाध्यक्ष उत्तम पाटील, दिनकर शेणवी, संदेश पाटील, संभाजी फराकटे, विष्णू पाटील, शहाजी गायकवाड, मेहबूब शहाणेदिवाण,सागर फराकटे, संतोष गायकवाड, यशवंत आळवेकर, दिनकर शिंदे आदी उपस्थित होते.
स्वागत बाळासाहेब पाटील यांनी केले.आभार यशवंत शेणवी यांनी मानले.
वाळवे खुर्द येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे.व्यासपिठावर बाबासाहेब पाटील,आनंदराव फराकटे,नंदकुमार पाटील.