
(कोल्हापूर /प्रतिनिधी )
आपणा सर्वांची ज्ञानगंगोत्री शिवाजी विद्यापीठाचा आज ६३ वा वर्धापन दिन. त्यानिमित्त रात्री नऊच्या सुमाराला विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मनोभावे नमन केले.
विद्यापीठाची मुख्य प्रशासकीय इमारत तर विविध रंगीबेरंगी प्रकाश किरणांमध्ये साक्षात न्हाऊन निघत होती. साहजिकच आकर्षक विद्युत रोषणाईने मुळचे हेरिटेज सौंदर्य खुललेल्या या मुख्य प्रशासकीय इमारतीची दृश्ये मनोहारी होती…….!




