(मुरगूड/ जोतीराम कुंभार )

मुरगूड नगरपालिका निवडणूकीसाठी आज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी तीनपैकी एक तर सदस्यपदासाठी ९६ पैकी ४५ जणांनी माघार घेतली त्यामुळे निवडणूक रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी २ तर सदस्यपदासाठी ४५ उमेदवार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी ३ तर सदस्य पदासाठी ९६ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. दोन्ही पॅनेल मध्ये नसणाऱ्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी त्यांची मनधरणी शेवटच्या क्षणापर्यंत सुरु होती.
प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या सुहासिनदेवी प्रविणसिह पाटील व राष्ट्रवादीच्या तसनीम राजेरवान जमादार यांच्या सरळ सरळ जोरदार लढत होणार आहे . या दोन्ही उमेदवार माजी नगराध्यक्षांच्या पत्नी आहेत.
या निवडणूकीचे दुरंगी लढतीचे चित्र आज स्पष्ट झाले आहे प्रभाग ५ अ व प्रभाग ६ ब तसेच प्रभाग ९अ येथे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारामुळे तिरंगी तर प्रभाग ७ अ , ब या दोन जागेसाठी सचिन मेंडके व सौ वर्षाराणी मेंडके या पती पत्नी ने राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्याने तेथेही तिरंगी लढत होत आहे . इतर ठिकाणी शिवसेना भाजपा युती विरुद्ध राष्ट्रवादी छ. शाहू आघाडी यांच्यात सरळ लढत रंगणार आहे.
या निवडणूकीचे वैशिष्ठ्ये म्हणजे तीन माजी नगराध्यक्ष निवडणूक मैदानात उतरले आहेत यामध्ये सुखदेव येरुडकर , नामदेवराव मेंडके , राजेखान जमादार यांचा समावेश आहे. गोकूळचे माजी अध्यक्ष राजितसिंह पाटील यांच्या पत्नी मंजूषा पाटील या रिंगणात उतरल्या आहेत. तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसीनम उमेदवार यांचे पती राजेरवान जमादार हे दोघेही पती पत्नी निवडणूक रिंगणात उतरले आहे . तर दोन्ही आघाड्यामधून १० आजी माजी नगरसेवक पुन्हा या निवडणूकीत आपले राजकीय भवितव्य अजामवत आहेत
या निवडणूकीसाठी एकूण १० प्रभागातील २० जागापैकी शिवसेना भाजपाने अनुक्रमे १४ व ६ जागा वाटप केले आहे तर राष्ट्रवादी – छ.शाहू आघाडीमध्ये अनुक्रमे १७ व ३ असा फॉर्मुला ठेवला आहे. त्यामुळे या दोन आघाडयामधेच तुल्यबळ चुरशी लढत होणार यात शंका नाही.
प्र.क.१ अ नामदेव चौगले राष्ट्रवादी विरुद्ध रणजीत भारमल भाजपा
प्र. क्र.१ ब मंजूषा पाटील राष्ट्रवादी विरुद्ध संध्या पाटील शिवसेना
प्र. क्र.२ अ सोनाली कलकुटकी राष्ट्रवादी विरुद्ध विजयमाला शिदे शिवसेनाप्रभाग क्र २ ब सुहास खराडे शिवसेना विरुद्ध सुखदेव येरूडकर राष्ट्रवादी प्रभाग क्र.३ अ गीतांजली आंगज शिवसेना विरुद्ध अमृता मोर्चे राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक ३ ब विजय राजगिरे शाहूवाडी विरुद्ध सुधीर सावर्डेकर भाजपा प्रभाग क्रमांक ४ अ पांडुरंग राजपूत भाजपा विरुद्ध बजरंग सोनुले राष्ट्रवादी प्रभाग क्र.४ ब निकेलिन बारदेस्कर शिवसेना विरुद्धआदिती सूर्यवंशी राष्ट्रवादी प्र क्र ५ अ विजय भोई उभाठा विरुद्ध सुनील रणवरे शिवसेना प्र क्र ५ ब शुभांगी दरेकर राष्ट्रवादी विरुद्ध रेखाताई मांगले शिवसेना प्र. क्र.६ अ सुजाता पुजारी भाजपा विरुद्ध सोनाली मेटकर राष्ट्रवादी, प्र६ ब अदिनाथ पाटील उबाठा सत्यजीत पाटील भाजपा , अश्विनी शेणवी छ.शाहू आघाडी प्र.७ अ संगीता चौगले राष्ट्रवादी, परिणीता मगदूम भाजपा, वर्षाराणी मेंडके अपक्ष प्र ७ ब अशोक खंडागळे राष्ट्रवादी, शिवाजी चौगले शिवसेना सचिन मेंडके अपक्ष प्र८अ वैशाली गोधडे शिवसेना, निलम बारड राष्ट्रवादी, प्र८ ब राजेंद्र आमते राष्ट्रवादी, नामदेव मेंडके शिवसेना
प्र९ अ आदिती कांबळे राष्ट्रवादी, सपना कांबळे उबाठा, संजीवनी कांबळे शिवसेना प्र९ ब समाधान बोते छ. शाहूआघाडी, दत्तात्रय मंडलिक शिव सेना प्र१० अ संगीता मोरे राष्ट्रवादी, सुरेखा लोकरे शिवसेना प्र१० ब शशिकांत गोधडे राष्ट्रवादी विरुद्ध अनिल राऊत शिवसेना



