
स्थानिक गुन्हा अन्वेशन आणि मुरगूड पोलिसांची कारवाई: ९ आरोपींना अटक तर ८ संशयित ताब्यात:१६ लाखाचा मुद्देमाल जप्तकोल्हापूर जिल्ह्यातील (सोनगे तां. कागल) येथील प्रकार.
(मुरगुड/ जोतीराम कुंभार)
महाराष्ट्र शासनाने नवीन शिक्षक नियुक्त करण्यापूर्वी त्यांनी त्यांचे डी.एड. व बी.एड. शिक्षण पात्रतेसह टी ई टी परीक्षा (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण असणे आवश्यक केले असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे शिक्षक होण्याचे शिक्षण पूर्ण झाले असले तरी अंतिम पात्रतेसाठी टीईटी परीक्षा देणे बंधनकारक केले आहे. संपूर्ण राज्यभरामध्ये शिक्षक टीईटी पात्रता परीक्षा सुरू होती या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुनानेशन व मुरगूड पोलिसांनी रविवारी पहाटे कागल तालुक्यातील सोनगे येथे केला याप्रकरणी नऊ जणांना अटक व कटातील नऊ संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यांच्याकडील कॅनान कंपनीचा प्रिंटर ९०,००० किमतीचे नऊ मोबाईल हँडसेट,१५ लाखाची फॉर्च्यूनर कार (क्र एम. एच. १२ क्यु. टी. ५९९९), शैक्षणिक कागदपत्रे व सहीचे कोरे चेक व परीक्षार्थींची नावाची यादी व रजिस्टर असा १६ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कट्टाचा मुख्य सूत्रधार सातारा जिल्ह्यातील असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. या कटामुळे खळबळ माजली आहे अटक केलेल्या नऊ जणांना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे . यामध्ये सेवेतील शिक्षक गुरुनाथ गणपती चव्हाण (वय ३८) राधानगरी, नागेश दिलीप शेंडगे (वय 30) रा. सावर्डे पाटण ता. राधानगरी, रोहित पांडुरंग सावंत (वय ३५) रा. कासारपुतळे ता. राधानगरी, अभिजीत विष्णू पाटील (वय ४०) रा. बोरवडे ता. कागल, अक्षय नामदेव कुंभार (वय २७) रा. सोनगे ता. कागल ,तर भावी शिक्षक दत्तात्रय आनंदा चव्हाण (वय ३२) रा. कासारपुतळे, किरण र सात्तापा बरकाळे (वय ३० रा. ढेगेवाडी) सर्व ता. राधानगरी, राहुल अनिल पाटील (वय ३१) रा. शिंदेवाडी ता. गडहिंग्लज ,दयानंद भैरू साळवी ( वय४१) रा. तमनाकवाडा ता. कागल या नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. तर रात्री उशिरा संदीप भगवान गायकवाड रा. सातारा याला ताब्यात घेतले आहे तर मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड फरार असून त्याच्या मागावर पोलीस पथके रवाना झाली आहेत या कटातील अन्य सात साथीदारांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
सदरची परीक्षा ही महाराष्ट्र शासनाने आज रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी राज्यभर नियोजित केली होती सदर परीक्षेत बसणारे विद्यार्थ्याकडून त्यांची मूळ कागदपत्रे व काही रक्कम घेऊन परीक्षेपूर्वी पेपर देतो असे सांगून फसवणूक करणारी टोळी कागल व राधानगरी तालुक्यात कार्यरत असल्याची माहिती गोपनीय माहितीगाराकडून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाली यानुसार या शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या विशेष पथकाने मुरगुड पोलिसांच्या सहाय्याने सापळा रचून सोनगे (ता. कागल) येथील गुरुकृपा फर्निचर मॉलमध्ये थांबलेल्या टोळीचा पर्दाफाश केला सदर टोळीतील दत्तात्रय चव्हाण व गुरुनाथ चौगले दोघे राधानगरी तालुक्यात राहणारे असून ते टीईटी परीक्षेचे अगोदरचे रात्रीचे वेळी विद्यार्थ्यांना तीन लाख रुपये दराने पेपरची झेरॉक्स देणार होते संबंधितांना सोनगे ता. कागल या ठिकाणी बोलवून घेऊन त्यांच्याकडून शैक्षणिक मूळ कागदपत्रासह प्रत्येकाकडून कोरे धनादेश घेऊन बोलावले होते यादरम्यान सदरच्या टोळीस मुद्देमाला सह ताब्यात घेतले याप्रकरणी व्याप्ती फार मोठी असण्याची शक्यता असून स्थानिक गुन्हा आन्वेशनविशेष शाखा या घटनेचा गांभीर्याने तपास करत आहेत. आज राज्यभरामध्ये आज राज्यभरामध्ये राज्यभरामध्येशिक्षक पात्रता परीक्षेसाठी लाखो परीक्षार्थी शिक्षक समाविष्ट झालेले होते पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र हा पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे या टीईटी पेपर फोडणाऱ्या टोळीला जेरबंद केल्याने राज्यभर त्यांचे पडसाद उमटले आहेत. या टोळीची व्याप्ती ओळखता यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे समजते. या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर ,उपनिरीक्षक जालिंदर जाधव, मुरगुडचे स.पो.नि. शिवाजी करे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव ,पोलीस अंमलदार युवराज पाटील, राजेश राठोड, विनोद चौगुले, प्रदीप पाटील, राजू कोरे, रोहित मर्दाने, विजय गोसावी ,अमित सर्जे ,अमित मर्दाने ,निवृत्ती माळी ,महेश खोत, सागर चौगुले, राजेंद्र वरंडेकर ,सुशील पाटील, संदीप डेकळे ,संतोष भांदीगरे,रवींद्र जाधव, रघुनाथ रानभरे ,भैरा पाटील ,रुपेश पाटील, व महिला पोलिस आमदार मीनाक्षी कांबळे यांनी सहभाग घेतला.



