
कागल/ दिनांक, २८:
कागल च्या जनतेने आजपर्यंत आम्हाला चांगली साथ दिली आहे. कागल च्या पुढील पाच वर्षाचा विकासाचा रोड मॅप आम्ही तयार केला आहे. जाहीरनाम्यामध्ये दिलेप्रमाणे विकास कामाची पूर्तता शंभर टक्के आम्ही करणार आहोत. त्यामुळे पुढील पाच वर्षात कागलची झेप ” स्मार्ट सिटी” कडे होईल असा आत्मविश्वास नामदार हसन मुश्रीफ व समरजीतसिंह घाटगे यांनी संयुक्तिकपणे कागल नगरपालिका निवडणूक जाहीरनामा प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केला.
कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व छत्रपती शाहू आघाडीच्या संयुक्त युतीच्या वचननामा प्रकाशन कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ व श्री. घाटगे बोलत होते.यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले, कागल शहर हे सर्वांगाने विकसित झाली पाहिजे हाच आमचा ध्यास आहे. पुढील पाच वर्षात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि पर्यटन दृष्ट्या कागल ला नक्की राज्याच्या नकाशावर यासाठी जनतेने यापुढेही आम्हाला साथ द्यावी. समरजितसिंह घाटगे म्हणाले, कागल ही छत्रपती शाहू महाराज यांची नगरी. पुढील पाच वर्षाकरिता कागलचे व्हिजन डॉक्युमेंट बनवताना छत्रपती शाहू महाराजांना अभिप्रेत असणारे कागल हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून हा विकासाचा रोड मॅप आम्ही तयार केला आहे. येत्या पाच वर्षात याची पूर्तता करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. कागल ला वैभवशाली कागल बनवण्याचा आमचा मार्ग कायम आहे. पुढील काळात कागल मध्ये असे काम करू याचा आदर्श इतर ही घेतील.
श्रीमंत घाटगे म्हणाले, कागल शहर विकासाच्या बाबतीत परिपूर्ण झालेलेच आहे या पुढील काळातही गतिमान विकासातून कागलची झेप स्मार्ट सिटी कडे होईल.
यावेळी बाबगोंडा पाटील, सौ. शोभा बाबगोंडा पाटील, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सविता प्रताप उर्फ भैया माने, उमेदवार प्रवीण काळबर, उमेदवार बी. जी. माळी, उमेदवार सौ. रजिया मुजावर आदी प्रमुखांसह प्रमुख मान्यवर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते…………



