(गडहिंग्लज /प्रतिनिधी)


आपल्या परिसरात प्राथमिक सेवा सुविधा देणारी मंडळी आणि आपल्या सुखदुःखात सहभागी होणारी माणसे कमी असतात. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तालमीत तयार झालेली व्यक्ती कुठेही कमी पडत नसलेला इतिहास असल्याने घरातून बाहेर पडल्यापासून ते रात्री घरी येईपर्यंत नेहमी तुमच्या सोबत असणारा रामगोंड उर्फ गुंडू पाटील आणि दर्शना कुंभार या उमेदवारांना पालिकेच्या निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन अमरीन मुश्रीफ यांनी केले.


प्रभाग नऊ मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुरबतमठ, नगरसेवक पदाचे उमेदवार रामगोंड उर्फ गुंड्या पाटील, दर्शना कुंभार यांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद साधत असताना त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना सौ. मुश्रीफ पुढे म्हणाल्या, प्रभागातील सर्वसामान्यांची कामे करण्याबरोबर शासनाकडून आलेल्या योजना घरोघरी पोहोचण्यापर्यंत गुंडू पाटील यांनी आघाडी घेतली आहे. कोरोना आणि महापुराच्या काळात रस्त्यावर थांबून जनतेची सेवा करत आपल्या सामाजिक कार्याचा ठसा प्रत्येकाच्या मनात बिंबवला आहे. त्याचबरोबर मंत्री मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करून प्रभागातील विविध रस्ते, गटारी बांधकाम, बगीच्या सुशोभीकरण, स्मशानभूमी, विविध मंदिरांचे सभागृह, समाज मंदिरे बांधणे आदी कामे केली आहेत.
यामुळे निवडणुकीच्या काळात त्यांना जनतेकडून मोठा आशीर्वाद मिळत आहे. आता त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना साथ देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
उमेदवार रामगोंड उर्फ गुंडू पाटील बोलताना म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांच्या पाठबळावर प्रभागातील सर्वांनी विकासकामे केली आहेत. जनतेची सेवा करण्यासाठी विविध गरजूंना आरोग्याची मदत, संघर्ष ग्रुपच्या वतीने आर्थिक मदत याबरोबर शासकीय योजना घरोघरी पोचवले आहेत. यामुळे प्रभागातील प्रत्येक कुटुंबाचा स्नेहसंबंध तयार झाला असून त्यांच्या सुखदुःखात आधार बनल्याची भावना तयार झाली आहे. त्यामुळे पाठिंबा मिळत असून निवडणुकीत विजयाची खात्री आहे.
यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुरबतमठ, उमेदवार दर्शना कुंभार, माजी नगरसेविका सावित्री पाटील, भारती कुंभार, निर्मला माने, रेणुका कोरी, इंदुबाई दड्डीकर, मीनाक्षी कोरी, शेवंता कदम, रेश्मा मोळदी, अशोक कुरबेट्टी, चंद्रकांत कुंभार, अनिल कुंभार, गोडसाखरचे संचालक शिवराज पाटील यांच्यासह प्रभागातील महिला मतदार उपस्थित होत्या.

—————————-
विकास कामाची यादीच विजयाचे प्रवेशद्वार
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पायाभूत सेवा सुविधा भक्कम झाले आहेत. तर शहरात सर्वाधिक शासकीय योजनेचे लाभार्थी देखील या प्रभागात असल्याने मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे येथील विकास कामाची यादीच विरोधकांपुढे कमी असून राष्ट्रवादीचे उमेदवार गुंडू पाटील आणि दर्शना कुंभार यांच्या विजयाचे प्रवेशद्वार असल्याचा विश्वास अमरीन मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *