(मुरगूड/ जोतीराम कुंभार)

नगरपरिषदेच्या मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सोमवारी मतदान केंद्र प्रतिनिधींना ईव्हीएम मशीनसह मतदानाचे इतर साहित्य वाटप करण्यात आले. ईव्हीएम मशीन आणि साहित्य मिळाल्यानंतर प्रतिनिधी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले. नगराध्यपद व नगरसेवकपदाच्या २० जागांसाठी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तेजस्विनी खोचरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी 45 नगरसेवक रिंगणात असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी छ.राजर्षी शाहू आघाडी विरुद्ध शिवसेना भाजप या दोन पक्षांमध्ये तुल्यबळ लढत पहावयास मिळत असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 3 उमेदवार रिंगणामध्ये असून नगराध्यक्ष पदासाठी भाजप शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस राजर्षी छ.शाहू आघाडी मध्ये थेट लढत पाहावयास मिळत आहे.
शहरातील एकूण मतदारांची संख्या पुरुष ४८५८आणि स्त्रिया ५२७० असे १०,१२८ मतदार आहेत.
प्रभाग निहाय मतदान संख्या ( कंसात मतदान केंद्राचे नाव ) पुढील प्रमाणे :
प्रभाग क्र.१-८६९( मुरगुड नगर परिषदेत जिम्नॅशियम हॉल साई आखाडा जवाहर रोड), प्रभाग क्र.२ -१००५(हुतात्मा स्मारक इमारत हॉल महात्मा गांधी रोड), प्रभाग क्र.३-८२६ (जीवन शिक्षण विद्यामंदिर शाळा नं.१ इमारत, उत्तर बाजू खोली क्र.१), प्रभाग क्र.४-१०२१ (जीवन शिक्षण विद्या मंदिर शाळा नं. १ इमारत पश्चिम बाजू खोली क्र. १, प्रभाग क्र.५-१२४६(मुरगुड विद्यालय इमारत दक्षिण बाजू खोली क्र. २ व उत्तर बाजू खोली क्र. २), प्रभाग क्र.६- ९७८(गावचावडी इमारत उत्तर बाजू खोली क्र.२), प्रभाग क्र.७- ११७५( शिवाजी विद्यामंदिर शाळा नं. २इमारत दक्षिण बाजू खोली क्र.१ व उत्तर बाजू खोली क्र.५), प्रभाग क्र.८- ९९०( कुस्ती संकुल हॉल नगर परिषद पॅव्हेलियन इमारत), प्रभाग क्र.९ –१०९५ (नगरपरिषद बालवाडी इमारत हुतात्मा तुकाराम चौकाजवळ), प्रभाग क्र.१०- ९२३( मुरगुड नगर परिषद बॅडमिंटन हॉल सूर्यवंशी कॉलनी पश्चिम बाजू) अशी मतदार केंद्रांची मतदार संख्या शहरामध्ये सर्वच मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे. प्रत्येक मतदार केंद्रावर १ केंद्र अध्यक्ष , ३अधिकारी ,१ शिपाई आणि एक पोलिस असणार आहेत. निवडणुकीसाठी ही सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुरगूड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका शांततेत पार पाडाव्यात, आचारसंहितेचा कोठेही भंग होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून १ डीवायएसपी, ४ एपीआय – पीएसआय अधिकारी, ४३ पोलीस अंमलदार, ३० होमगार्ड तर ७ एस आर पी अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती मुरगुड पोलीसचे एपीआय शिवाजी करे यांनी दिली.

महिला मतदान केंद्र
मुरगूड येथील प्रभाग क्रमांक ९ चे मतदान केंद्र हे महिला आदर्श मतदान केंद्र म्हणून ओळखले जाणार आहे या ठिकाणी
केंद्र अध्यक्ष , ३ अधिकारी ,१ शिपाई आणि एक पोलिस सर्व महिला ही जबाबदारी पार पाडणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *