( कागल/ प्रतिनिधी )

नगरपालिका निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने सोमवार दि. १ हा मतदानाच्या आधीचा एक दिवसही जाही प्रचारासाठी वाढवून दिला. या दिवसाचाही उपयोग करून घेत मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष समरजीतसिंहराजे घाटगे यांनी व्यक्तिगत गाठीभेटींवर भर दिला. या दोन्ही नेत्यांनी कागल शहरातील ब्रह्मपुरी भागात पायी फेरफटका मारून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांसोबत राजकीय गप्पांबरोबरच व्यक्तिगत गप्पा टप्पा करीत हे दोन्ही नेते ठीकठिकाणी चहापान घेत होते.

सकाळी दिवसाच्या सुरुवातीलाच मंत्री श्री. मुश्रीफ यांनी अलका शेती फार्मवर जाऊन कागल नगरपालिकेचे नियोजन केले. तसेच; मंत्री श्री. मुश्रीफ यांनी कागलसह मुरगूड, गडहिंग्लज व चंदगड नगरपालिका निवडणूक वातावरणाचा फोनवरूनच आढावा घेतला व जोडण्या लावल्या.

दुपारी साडेतीनच्या सुमाराला मंत्री श्री. मुश्रीफ जयसिंगपूर, कुरुंदवाड व शिरोळकडे रवाना झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *