( कोल्हापूर /आदित्य सुतार )

रविवारचा दिवस म्हणजे लहान मुलांसाठी आनंदाचा दिवस. या दिवशी मुलांचे विविध खेळ, मनोरंजन किंवा पर्यटन याकडे लक्ष. पण आज शांती उद्यान मधील एक वेगळाच बेत बालचमुनी आखला. कॉलनी मध्ये असलेले गजानन महाराज मंदिराच्या सभोवताची सर्वांनी मिळून सामुदायिक स्वच्छता केली. मंदिर परिसरातील प्लॅस्टिक कचरा,पाला पाचोळा गोळा केला.
या बालचमुनी सामुदायिक स्वच्छतेचा समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला. सुट्टीचा दिवस असूनही मुलानी सामाजिक भान जपत मंदिराची स्वच्छता करण्याचा निश्चितच कौतुकास्पद आहे. सकाळी आठ ते अकरा या वेळेमध्ये प्रचंड थंडी असूनही मुलानी मंदिर परिसराची स्वच्छता केली.
या स्वच्छता मोहीम मध्ये अथर्व ठाकर, शौर्य पाटील, समरजीत ठाकर, युग पाटील ,आदित्य ठाकर ,तनिष्क सूर्यवंशी, आयुष कुंभार, भैय्या पावले ,शंभू पावले, आदित्य भोसले व श्लोक कुकडे,हर्ष कुकडे,वेदांत कुकडे या बालचमुनी या मोहिमेत सहभाग घेतला.
एकीकडे सुट्टीचा उपयोग चंगळवादासाठी घालवणारी मुलं आपण पाहतो. पण शांती उद्यान मधील या मुलांनी सामुदायिक स्वच्छतेचा उपक्रम राबवून स्वच्छतेचे महत्व विशद केले. मुलांच्या या उपक्रमाच्या गोष्टीचे नागरिकांच्यामधून कौतुक होत आहे.

समाजाला स्वच्छतेचे महत्व सांगण्याबरोबरच स्वच्छतेच्या कृतीचा आदर्श मुलानी निर्माण केला.सुट्टीच्या दिवशी समाजभान जपत आपला मौलिक वेळ स्वच्छतेसाठी दिला ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आजची तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असताना या लहान मुलांनी मात्र आठवड्यातून एक तास स्वच्छतेसाठी आपल्या देश भक्ती साठी असा संदेश समाजाला दिला आहे. सहभागी सर्व मुलांचे अभिनंदन.
– सुषमा सुतार ( शिक्षिका)



