
(बिद्री / प्रतिनिधी ) : जिल्हा परिषदचे माजी सदस्य व बिद्री साखर कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन मनोज फराकटे यांच्या वाढदिवसानिमित्त बिद्री ( ता. कागल ) येथील भारतमाता हायस्कूल शाळेत विद्यार्थ्यांना फळे, खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पं. स. सदस्य रघुनाथ कुंभार होते.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक एस. पी. पाटील म्हणाले, मनोज फराकटे यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात अल्पावधीत उत्तुंग कार्य केले आहे. त्यांच्या कामाची झेप मोठी असून भविष्यात त्यांच्या हातून सर्वसामान्य जनतेची कामे निश्चितच पूर्ण होतील.
यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक डी. एम. चौगले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी. व्ही. पाटील, धनाजी फराकटे, बोरवडेचे उपसरपंच दत्तात्रय पाटील, माजी उपसरपंच विनोद वारके, फराकटेवाडीचे माजी उपसरपंच के. के. फराकटे, एकनाथ चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आनंदा वरुटे, प्रमोद माने, रामेश्वर सावरतकर, मुख्याध्यापक एस. पी. पाटील यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत सुनील माजगावकर यांनी केले तर आभार व्ही. आर. कुंभार यांनी मानले.



