शाहू मार्केट यार्डमधील पक्षाच्या कार्यालयात होणार मुलाखती

(कोल्हापूर, / प्रतिनिधी)


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांच्या तालुकानिहाय मुलाखती शनिवारी दि. दहा व रविवार दि. ११ रोजी होणार आहेत. कोल्हापुरात शाहू मार्केट यार्ड परिसरात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात या मुलाखती होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या मुलाखतीवेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगदादा गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील- सडोलीकर आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

मुलाखतींचा तालुकानिहाय कार्यक्रम असा,

शनिवार दि. दहा रोजी…..
सकाळी नऊ ते अकरा: करवीर. अकरा ते साडेअकरा: गगनबावडा. साडेअकरा ते साडेबारा: पन्हाळा. साडेबारा ते दीड: शाहूवाडी. दीड ते अडीच: राखीव. अडीच ते साडेतीन: हातकणंगले. साडेतीन ते पाच: कागल.

रविवार दि. ११ रोजी …..
सकाळी नऊ ते साडेदहा: राधानगरी. सकाळी साडेदहा ते साडेअकरा: भुदरगड. दुपारी साडेअकरा ते साडेबारा: आजरा. दुपारी साडेबारा ते दीड: चंदगड. दुपारी दीड ते अडीच: राखीव. दुपारी अडीच ते साडेतीन: गडहिंग्लज. साडेतीन ते पाच: शिरोळ.

===≈====

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *