
(सोनाळी/ प्रतिनिधी)
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले कागल तालुक्यातील निढोरी येथील भिमराव रामचंद्र कांबळे यांची भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चा (ग्रामीण पश्चिम) च्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीचे काम समाजातील प्रत्येक घटकात वाढवून पक्ष विस्ताराचे काम अधिक जोमाने करतील अशा अपेक्षेसह त्यांना जिल्हाध्यक्ष पांडुरंग वायदंडे यांनी निवडीचे पत्र दिले.
या निवडीकामी त्यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी
पाटील, भाजपा कागल तालुका विधानसभा प्रमुख अंबरिष घाटगे, संतोष ढवण, नीळपणचे संतोष पाटील, वसंत प्रभावळे ( कुर) यांचे सहकार्य लाभले.



