(कोल्हापूर /प्रतिनिधी )
Tata Electronics कंपनीने मोठा इतिहास रचला आहे. भारतात निर्मिती झालेल्या पहिल्या सेमीकंडक्टर चिप्सची पहिल्यांदा निर्यात झाली आहे. पथदर्शी प्रकल्पाची ही पहिली यशोगाथा भारताने लिहिली आहे. एका छोट्या प्रमाणात का असेना या पायलट प्रकल्पाला यश आल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. कोरोना काळात चीनमधील उद्योगांना मोठा फटका बसला.
चीन आणि तैवानमधून मोठ्या प्रमाणात जगाला सेमीकंडक्टर, चीपचा पुरवठा करण्यात येत होता. कोरोना काळात पुरवठा खंडित झाल्याने अनेक कार आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या उत्पादनावर परिणाम दिसला. त्याचवेळी भारताने सेमीकंडक्टर हब होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. आज त्यात इवलेस पाऊल भारताने टाकले आहे.