December 23, 2024

(कागल /प्रतिनिधी )

वंचित बहुजन आघाडी कागल अंतर्गत श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त कागल शहरांमध्ये विविध ठिकाणी शालेय उपयोगी वह्या पेन, फळे वाटप करण्यात आले .

अनाथ मुलांचे कागल येथील” द कागल एज्युकेशन सोसायटी संचलित” मुलांचे बालगृह कागल, या शाळेमध्ये भेट देऊन लहान मुलांना शालेय उपयोगी वह्या ,पेन, व फळे वाटप करण्यात आली. तसेच कागल येथील सरकारी दवाखाना येथे पेशंट याना फळे वाटप करण्यात आली. व करनूर टोल नाक्याजवळ वृद्धाश्रमाला भेट देऊन फळे वाटप करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, तालुका अध्यक्ष धनाजी सेनापतीकर ,तालुका महासचिव सातापा कांबळे व महेश कांबळे युवा महासचिव, गगन कांबळे नंदकुमार शितोळे कुणाल कांबळे इत्यादी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *