गारगोटी / प्रतिनिधी

कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने गारगोटी येथील डॉ. डी.वाय.पाटील मराठी कान्व्हेंट स्कूलचे गुणवान व उपक्रमशील शिक्षक शिवाजी कृष्णा चौगुले (बहिरेवाडी) यांना ‘ विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराचे स्वरुप शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे असून त्यांना हा पुरस्कार आयएसटीई,नवी दिल्लीचे एक्झिक्युटिव्ह कौन्सिल सदस्य व प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे होते.प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिका प्रशासनाधिकारी डी.सी.कुंभार उपस्थित होते.
श्री.चौगुले यांनी गेली २८ वर्षे उत्कृष्ट अध्ययातून अनेक विद्यार्थी घडविले आहेत.शिष्यवृत्ती,नवोदय परिक्षा, गणित व विज्ञान प्रज्ञाशोध परिक्षेत त्यांच्या विद्यार्थीनी चमकदार यश मिळविले आहे.तसेच एक अभ्यासू,कर्तव्यदक्ष शिक्षक व दररोज सकाळी साडेसात ते रात्री आडेआठ वाजेपर्यंत शाळेत त्यांचे एकही रजा न घेता त्यांचे अव्याहतपणे अध्यापन सुरु असते.याची दखल घेत कोणताही प्रस्ताव मागवून न घेता त्यांची या पुरस्काराठी निवड करण्यात आली होती।
यावेळी हातकणंगले गटशिक्षणाधिकारी जे.टी.पाटील, चेअरमन सात्तापा कासार,व्हा.चेआरमन अमित परिट,सचिव वसंत पाटील सर्व संचालक मंडळ,सल्लागार समिती सदस्य उपस्थित होते.
श्री.चौगुले यांना डॉ. डी.वाय पाटील शिक्षण सुमूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील, अध्यक्ष संजय डी.पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले.



