( सोनाळी / प्रतिनिधी )     

    महाराष्टृही संतांची भुमी आहे. समाजाच्या जडणघडणीत त्यांचे योगदान महत्वाचे राहिले असून आज त्यांचे विचार युवा पिढीने जोपासण्याची आवश्यकता आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आध्यात्माची जोड हवी असे प्रतिपादन बालकिर्तनकार रणवीर पोवार यांनी केले.

           सोनाळी ( ता. कागल ) येथे आयोजित प्रवचन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.          

         याप्रसंगी  बोलताना ग्रामपंचायत सदस्य समाधान म्हातुगडे म्हणाले, छत्रपती शिवरायांचे विचार आजच्या नव्या पिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे. संगणक व मोबाईलच्या युगात ग्रामीण भागातील संस्कृती जपली पाहिजे.

       यावेळी उपस्थित महिला भक्तांच्यामधून सोडत पध्दतीने साडी विद्या चौगले यांना देण्यात आली. भिमराव पाटील यांचे हस्ते पंढरपूर येथे असलेले सोनाळीचे सुपुत्र बालप्रवचनकार रणवीर पोवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला , विद्यार्थी, जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *