( आदमापूर / प्रतिनिधी):

कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे सुरू असलेल्या श्री बाळूमामा भंडारा उत्सव निमित्त आजपासून देशी गोवंश प्रदर्शनास सुरुवात करण्यात आली आहे. या प्रदर्शनात विविध जातींच्या देशी गायी प्रदर्शन ठेवण्यात आले असून शेतकरी आणि पशुपालकांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.या प्रदर्शनामध्ये देशी गोवंश संवर्धनाचा संदेश देत विविध गटांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्कृष्ट गोवंश निवडून विजेत्यांना रोख बक्षिसेही दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ७ हजार, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
भंडारा उत्सवानिमित्त महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविक व पशुपालक आदमापूर येथे दाखल होत आहेत. मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांसह विविध सांस्कृतिक आणि कृषी-पशुपालनाशी संबंधित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री बाळूमामा मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असून संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.



