(विषेश वृत्त /समाधान म्हातुगडे )
आज कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बिद्री, गारगोटी , आदमापुर, मुरगूड, मुदाळ तिटा येथील पेट्रोल पंपावर अचानक वाढलेल्या गर्दीमुळे नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, इंधन टंचाईच्या अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी पंपांवर धाव घेत आहेत. परिणामी अनेक पंपांवर मोठी गर्दी झाली आहे.
स्थानिक प्रशासनाने मात्र स्पष्ट केले आहे की, इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तरीही भीतीपोटी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, काही ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली असून, पोलिस आणि प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *