December 23, 2024

दिव्यांग बंधू धनाजी गोरडे याना ई रिक्षा मंजूर

( कागल / प्रतिनिधी )

दिव्यांग,अनाथ,आणि मुक-बाधिर बांधवांच्या पाठीशी राहणे,त्यांना शक्य तेवढी मदत करणे, शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे,व त्यांना प्रोत्साहन देणे हा आमच्या सामाजिक कार्याचा अविभाज्य भाग आहे.या सर्व बांधवांच्या स्वावलंबनासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत असे प्रतिपादन भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

येथील दिव्यांग बंधू धनाजी बिरू गोरडे यांना महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मुंबई यांच्या मार्फत ई _लर्निंग रिक्षा मंजूर झाली आहे.ही इलेक्ट्रिक रिक्षा नुकतीच श्री गोरडे यांना शासनामार्फत नुकतीच प्रधान करण्यात आली. या आनंदा प्रत्यर्थ राजे समरजितसिंह घाटगे यांनी प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन श्री गोरडे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, स्वयंरोजगारातून दिव्यांग बंधूंचे जीवनमान सुधारावे व दैनिक उदरनिर्वाचे साधन म्हणून दिव्यांगा साठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात या योजनेत श्री गोरडे यांचा समावेश झाला आहे.
शासनाच्या या उपक्रमाचे मी मनापासून अभिनंदन करतो. दिव्यांग बंधू धनाजीच्या या यशस्वी वाटचालीचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार व्हावे. त्यांना प्रोत्साहित करावे या हेतूने आज प्रत्यक्ष त्याच्या घरी भेट देऊन त्याला शुभेच्छा दिल्या.

यावेळी छावा दिव्यांग संघर्ष सेल चे जिल्हाध्यक्ष संतोष मिसाळ, राजे बँकेचे व्हाईस चेअरमन नंदकुमार माळकर संजय माळकर, सुनिल कालेकर,दिग्विजय कुलकर्णी, संजय पाटील, दीपक मगर, अशिफ मुल्ला , विठ्ठल राऊत, मयूरेश बोते, विश्वजित पोतदार सह दिव्यांग बंधू,नागरिक उपस्थित होते

……. दिव्यांग बांधवांच्या मध्ये मोठे कुतूहल

यावेळी श्री घाटगे यांच्या हस्ते ‘ई ‘ रिक्षाची पूजा करण्यात आली.पूजेनंतर त्यांनी दीव्यांग बंधू श्री गोरडे यांच्या मार्फत रिक्षातून फेर फटका मारला.याचे मोठे कुतूहल उपस्थित दीव्यांग बांधवांच्या मध्ये होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *