(तिटवे /प्रतिनिधी )
तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय येथे दि. 19 एप्रिल रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वग्राम फाईनकेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी मुलाखती घेण्यात आल्या. एकूण 100 विद्यार्थिनींची मुलाखत घेण्यात आली. त्यापैकी चौदा विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या मार्गदर्शनातून हा मेळावा घेण्यात आला.
महिला सबली करणासाठी शहीद शिक्षण प्रसारक मंडळ नेहमीच अग्रेसर राहिले आहे. सर्वाधिक प्लेसमेंट करणारे महाविद्यालय अशी ख्याती बनविण्याचा ध्यास आम्ही घेतला आहे. त्या अनुषंगाने आजच्या या रोजगार मेळाव्यातून पात्र उमेदवारांना नोकरीची संधी दिल्यामुळे आमच्या या कार्यास सर्वग्राम फाईनकेअर कंपनीचा मोलाचा हातभार लागला असे मत प्राचार्य प्रशांत पालकर यांनी व्यक्त केले.
राहूल जाधव यांनी सुरुवातील कंपनींची माहिती दिली. त्यांच्याकडून मिळणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली. शहीद महाविद्यालयातर्फे आयोजित मुलाखतींसाठी कोल्हापूर आणि राधानगरी परिसरातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या. राहूल जाधव व निलेश पाटील या तज्ञांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सिद्धता गौड यांनी केले आणि आभार प्रा. अविनाश पालकर यांनी मानले.यावेळी उपप्राचार्य प्रा. सागर शेटगे,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.