(मुरगूड/ प्रतिनीधी : जोतीराम कुंभार )
मुरगूड येथील ज्येष्ठ नागरिक संघाची १४वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या वर्धापन दिनी नुकतीच संपन्न झाली .सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे होते .
संघाच्या वर्धापन दिनानिमित्त दिपप्रज्वलन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले . संघाचे उपाध्यक्ष पी.डी. मगदूम यांनी स्वागत केले . तर जयवंत हावळ यांनी मयत सभासदांना श्रध्दांजली वाहण्याचा व दुखवट्याचा ठराव मांडला .
संघाचे सचिव सखाराम सावर्डेकर यांनी अहवाल वाचन केले . यावेळी बोलताना संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे म्हणाले . जगामध्ये झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे अशा परिस्थितीत कुटूंबातील कौटुंबिक संबध लोप पावत आहेत ज्येष्ठ नागरिकांना कौटुंबीक संबधात वावरणे कठीण झाले आहे . त्यांना आपले उर्वरीत आयुष्य सुखासमाधानात घालवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघांची गावागावात स्थापन होणेची गरज आहे .
या सभेत संघाचा ताळेबंद मांडण्यात आला . तसेच संघाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला . यावेळी ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला . तर मार्च व एप्रिल महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला .
सभेस संघाचे संचालक शिवाजीराव सातवेकर , महादेवराव वाघवेकर ‘ रणजितसिंह सासणे , सदाशिव एकल ‘ रामचंद्र सातवेकर सिकंदर जमादार , गणपती शिरसेकर ‘ प्रदीप वर्णे आदि उपस्थित होते .एम.टी. सामंत यांनी आभार मानले