कोल्हापूर / प्रतिनिधी
गीत गाता चल या म्युझिक ग्रुपच्या वतीने रविवारी १९ मे रोजी सायंकाळी पाच वाजता हिंदी, मराठी कराओके ट्रॅक वरील ‘आ देखे जरा… किसमे कितना है दम’ हा सदाबहार गीतांचा कार्यक्रम होणार आहे. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. यावेळी सीआयडी विभागाच्या पोलीस अधीक्षिका मनीषा दुबुले, पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्याधिकारी म्हाडा पुणे चे अशोक पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना संजय माणके व नेहा माणके यांची आहे. कार्यक्रमाचे निवेदन अशोक पाटील करणार आहेत. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून प्रकाश सुतार जबाबदारी पार पाडणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये २५ गाणी सादर होणार आहेत. संपूर्ण कार्यक्रम मोफत असून, रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजय माणके यांनी केले आहे.